Forest department silence on animal death
Forest department silence on animal death sakal
अकोला

प्राण्यांच्या मृत्युप्रकरणी वनविभागाचे मौन

सकाळ वृत्तसेवा

मानोरा : वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गव्हा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात वीस दिवसाअगोदर वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला होता. त्या वन्य प्राण्याचे मृतदेह खड्डा करून पुरण्यात आले. मात्र गावातील एका जागरूक नागरिकाने ही बाब वनविभागाला कळविल्यामुळे, वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करून वन्य प्राण्याचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. मृत प्राण्याचे अवशेष प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. याबाबत वनविभाग मौन बाळगून आहे.

मानोरा तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल विरळ झाल्यामुळे वन्य प्राणी आपली उपजीविका करण्यासाठी शेतातील उभे पिके फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांने शेतात लावलेली लावगड निघणे कठीण झाली आहे. अशात शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचविण्यासाठी तार कुंपणास जिवंत वीज प्रवाह सोडतात. जेणे करून वन्यप्राणी शेतात पिकाचे नुकसान करण्यासाठी शेताकडे आल्यास अशा वन्यप्राण्यांपासून पिके सुरक्षित रहावी हा शेतकऱ्यांचा उद्देश तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी असाच प्रयोग केला. जिवंत प्रवाहाला स्पर्श होऊन महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल झाले.

असे असले तरी वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षणासाठी असाच जीवघेणा प्रयोग गव्हा येथे वीस दिवसाअगोदर झाला. यात काही वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला तेथे वन्य प्राण्याचे मृतदेह काही दिवस असेच पडून होते. त्यानंतर शेतात खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आल्याची चर्चा गावात दबक्या आवाज सुरू असून ही बाब गावातील गुप्त बातमीदाराकडून वन विभागाला कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा पंचनामा करून मृत प्राण्याचे शवविच्छेदन करून त्या वन्य प्राण्याचे तुकडे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या सोबत वारंवार भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता कोठलाच प्रतिसाद मिळत नाही. भेट घेण्यासाठी कार्यालयात वेळ मागितले असता साहेब बैठकीत व्यस्त आहे, असे उत्तर मिळाले. मात्र भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मृत वन्य प्राण्यांच्या प्रकरणात वनविभाग एवढे मौन बाळगून का आहे, याबाबत काहीही कळू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT