Bacchu Kadu Victory on Sangrampur Nagarpanchayat Sakal
अकोला

बुलडाणा : बच्चू कडूंची जोरदार एन्ट्री', भाजपच्या माजी मंत्र्यांवर 'प्रहार'

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : कोरोना संसर्गाचे नियम पालन करत आज (ता.19) प्रशासनाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना जोरदार एन्ट्री केली. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कडूंच्या प्रहार पक्षाने १२ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे.

संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत (Sangrampur NagarPanchayat Election Result) १७ जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये बच्चू कडू (Bachhu Kadu) यांचा प्रहार पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्यांनी माजी मंत्र्यांना जोरदार टक्कर दिली. आजी आणि माजी मंत्र्यांच्या गटामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत होते. त्याप्रमाणे आजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच येथील निवडणुकीत नशीब आजमवित 12 जागांवर विजय मिळविला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाआघाडीला 5 जागा तर राष्ट्रवादी, भाजप आणि वंचितला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मतदार संघातील संग्रामपूर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्‍वास अनेकांना होता. परंतु, एकही उमेदवार विजयी न झाल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

संग्रामपूर नगरपंचायतीमध्ये प्रहार जनशक्तीकडे बहुमत असल्याने ते सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील आणि मतदार संघात भाजपच्या हातातून एक नगरपंचायत जाणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ताधारी आमदारांना फटका बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT