Maratha Reservation and Obc Reservation
Maratha Reservation and Obc Reservation Sakal
अकोला

Maratha Reservation : अकोला जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उद्या जरांगे यांची सभा; तर सकल ओबीसींचा गुरुवारी ‘एल्गार मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

अकोला - जिल्ह्यात या आठवड्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांची पातूर तालुक्यात चरणगाव येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता सभा होणार आहे तर ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.७) अकोला शहरात एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित जरांगे पाटील यांच्या सभेसाठी १०० एकरावर पार्किंगसह व्यवस्था करण्यात आली आहे. सभेंतर्गत समाजबांधवांच्या सुविधेसाठी तसेच सभेच्या यशस्वीतेसाठी एक हजार स्वयंसेवींची उपस्थिती राहणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

आयोजित सभेवेळी स्टेजवर फक्त मनोज जरांगे पाटील उपस्थित राहतील व केवळ तेच सभेला संबोधित करतील, इतर कोणाचेही भाषण राहणार नाही, असे आयोजकांतर्फे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. जरांगे पाटलांची विदर्भातील सर्वात मोठी सभा चरणगाव येथे होणार असल्याने, त्यासाठी संपूर्ण विदर्भातून समाजबांधवांची उपस्थिती राहणार आहे. शेगाव येथून जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमण होईल.

आरक्षणासाठी ओबीसींचा एल्गार

ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्या वतीने जवळपास ३५ समाज संघटनांना सोबत घेऊन एल्गार मोर्चाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले आहे. बीसींचे संविधानिक आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसीमधील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आणि ओबीसींच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ‘सकल ओबीसी महामोर्चा’ आयोजित करण्यात आला.

‘सकल ओबीसी महामोर्चा’ ता.७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदान अकोला येथून सुरू होईल. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात अकोला जिल्ह्यातील तमाम ओबीसी व मायक्रो ओबीसींनी प्रचंड प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालमुकुंद भिरड, ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. संतोष राहाटे, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल प्रकाशराव राऊत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT