लबिया संशोधन विभागाला भेटी प्रसंगी ते बोलत होते लबिया संशोधन विभागाला भेटी प्रसंगी ते बोलत होते
अकोला

देशाअंतर्गत तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : देशाअंतर्गत औद्योगिक व घरगुती वापरातील खाद्य तेलाची गरज व आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलांच्या किमती लक्षात घेता फायदेशीर शेती व्यवसायासाठी देशांतर्गत तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. तेलबिया संशोधन विभागाला भेटी प्रसंगी ते बोलत होते.

पूर्वी शेतकरी त्यांचे शेती नियोजनात एकदल, द्विदल आणी तेलबिया पिकांची लागवड सर्वसाधारणपणे प्रत्येकच गावात करत होते, किंबहुना गावातीलच लहान तेल घाणीच्या माध्यमातून घरगुती वापराचे खाद्यतेल शेतकरी गावपातळीवरच तयार करत होते. मात्र, बदलत्या परिस्थितीत विविध कारणांनी तेलबिया पिकाखालील क्षेत्रात घट होत गेली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची आयात सध्या करावी लागत असून, त्याद्वारे अत्यंत मोलाचे परकीय चलन परदेशात जात आहे.

यावर मात करण्यासाठी व फायदेशीर शेती व्यवसायासाठी पुन्हा एकदा गाव पातळीवर तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवडीसह, कृषी प्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करीत गावपातळीवरच खाद्य तेल निर्मिती करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन सुद्धा कुलगुरू डॉ. भाले यांनी केले. सूर्यफूल, करडई, भुईमूग, जवस, कराळ या पिकांचे लागवड क्षेत्र वाढविणे व उत्पादकता वाढीवर भर देणे सुद्धा गरजेचे आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाला भेट द्यावी. विद्यापीठाद्वारे करडई उत्पादन व प्रक्रियाद्वारे तेलनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित असून, याच धरतीवर गावोगावी तेल निर्मिती शक्य असल्याचे देखील डॉ. भाले यांनी सांगितले. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तेलबिया शास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संतोष गहूकर उपस्थित होते.

महाज्योती अंतर्गत विनामुल्य बियाणे

यावर्षी रब्बी हंगामात करडी पिकाचे लागवड क्षेत्र वाढावे या उद्देशाने महाज्योती अंतर्गत करडई पीक लागवडीकरिता शेतकऱ्यांना बियाणे विनामूल्य उपलब्ध होणार आहेत. तयार झालेले उत्पादन सुद्धा हमीभावाने विकत घेणार आहे. ही योजना ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीकरता प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर २२०० रुपयांच्या निविष्ठा डिबिटीव्दारे मिळणार आहेत. यामध्ये क्लस्टर धर्तीवर करडई लागवड राबविणे अपेक्षित असून, याकरिता गावातील नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी मोहीम हाती घ्यावी, असे आव्हान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT