पीसीबीने सुधारली ना‘पाक’ कृती; अखेर जर्सीवर टाकले भारताचे नाव

pcb
pcb pcb

नागपूर : भारतात कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर बीसीसीआयने देशात टी-20 विश्वचषक घेण्यास नकार दिला. तसेच हा विश्वचषक यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये आयोजनाचे ठरले. मात्र, या स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट बोर्डाकडेच (बीसीसीआय) आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ना‘पाक’ कृती करीत जर्सीवर भारताचे नाव टाकले नाही. यावर जोरदार टीका झाली. यानंतर पीसीबीने आपली चूक सुधारत जर्सीवर भारताचे नाव टाकले.

रविवारपासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपसाठी प्रत्येक संघाने नवीन जर्सी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघासाठी जर्सी व्हायरल केली होती. आयसीसीच्या नियमानुसार जो देश विश्वचषकाचा यजमान असतो, त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर टाकावे लागते. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ना‘पाक’ कृत्य करीत आपल्या जर्सीवर भारताचे नाव टाकले नाही.

पीसीबीने जर्सीवर यजमान म्हणून भारताच्या जागी यूएईचे नाव लिहिले होते. ही स्पर्धा यूएई आणि ओमान या देशांमध्ये आयोजिण्यात आली असली तरी यजमानपद भारतीय क्रिकेट बोर्डाकडे आहे. कारण, ही स्पर्धा सुरुवातीला भारतातच होणार होती. मात्र, कोरोनाने कारण पुढे केल्याने स्पर्धा भारतात न होता या दोन देशांमध्ये खेळली जाणार आहे.

pcb
महिलांमध्ये १४ टक्के स्तन कॅन्सर; लक्षणे व उपाय जाणून घ्या

नव्या जर्सीत सुधारली चूक

आयसीसीच्या नियमाप्रमाणे वर्ल्डकप खेळण्यासाठी सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला जर्सीच्या उजव्या बाजूला स्पर्धेचे नाव आणि आयोजकांचे नाव लिहिले बंधनकारक आहे. ही स्पर्धा युएई व ओमानमध्ये होत असली तरी आयोजक भारतच आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोत बाबरने घातलेल्या जर्सीवर आयोजक भारताऐवजी यूएई लिहिले होते. पीसीबीने नव्या जर्सीमध्ये चूक सुधारली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com