अकोला

अकोला : पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा तुटवडा

जनावराच्या आरोग्याचा प्रश्न; पशुपालक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारांच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे.

तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गत अनेक महिन्यांपासून जनावरांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पशुपालन करणाऱ्या बांधवांना आपल्या जनावरांसाठी आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गोचिडांची औषध, जंताची औषध, चाटण गोटा, कॅल्शियम पावडर इत्यादी अनेक प्रकारच्या औषधी नसल्यामुळे पशुपालन करणाऱ्यांना आपले पशू आजारी पडले असता, त्यांना औषधे कुठून आणायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाहेरून औषध आणायची असल्यास मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे पशुपालन करणाऱ्यांना व शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तरी, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा करावा अशी, मागणी पशु पालक व शेतकरी बांधवांकडून होत आहे.

"तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये काही औषधांचा तुटवडा असून, औषधी मिळण्याकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे."

-डॉ.एम. ए. दांदळे, पशुधन विकास अधिकारी.

"तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या औषधी नसल्यामुळे आमच्या जनावरांकरिता औषधी आणायच्या कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला असून, बाहेरून महागडे औषध आणावे लागत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तरी, वरिष्ठांनी याची दखल घ्यावी."

-रवींद्र म्हैसने, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT