भीमराया, घे तुझ्या या लेकरांची वंदना

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण
Babasaheb Ambedkar
Babasaheb Ambedkar

मुंबई : कोरोना, ओमीक्रॉन आणि वादळ-वाऱ्यांचा धोका अशी अनेक संकटे समोर असताना देखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी भीम अनुयायी मोठ्या संख्येने दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल झाले. कोरोनाचे नियम पाळत, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले. 'जरी संकटाची काळ रात होती, तरी भीमराया तुझी साथ होती', 'भीमराया, घे तुझ्या या लेकरांची वंदना' असे गाणे गुणगुणत अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

मागील वर्षी कोरोनामुळे अनुयायांनी घरातूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले होते. त्यामुळे यंदा चैत्यभूमी येथे जाऊन अभिवादन करण्याचे प्रत्येक अनुयायांनी ठरविले होते. मात्र, राज्य सरकारचे खबरदारी, तयारीचे परिपत्रक उशीरा निघाले. तर, रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्ल्यांच्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या नाही. परिणामी, यंदा चैत्यभूमी येथे देशभरातून येणाऱ्यांची संख्या कमी होती. दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशासह जगातून अनुयायी दाखल होतात. मात्र, यंदा कोरोनाचे नियम, ओमीक्रॉनचे संकट, उशिरा झालेल्या निर्णयामुळे, अनुयायांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने देशातून येणाऱ्या अनुयायांची संख्या तुरळक होती.

Babasaheb Ambedkar
एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार | ST STRIKE

दरवर्षी मुंबई व उपनगरातील, ठाणे भागातील अनुयायीनी 5 डिसेंबर किंवा 7 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. कारण दरवर्षी चैत्यभूमी येथे मोठ्याप्रमाणावर अनुयायींची गर्दी होत असते. त्यामुळे देशांसह राज्यांतून आलेल्या अनुयायांना लवकर अभिवादन करता यावे व परतीची वाट लवकर धरता यावी. गर्दी होऊ नये, यासाठी मुंबईतील व उपनगरातील अनुयायी 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे मोेठ्या संख्येने जात नव्हते. मात्र, यंदा राज्यबाहेरून येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने 5, 6 डिसेंबर रोजी मुंबई महानगरासह राज्यातील अनुयायांची संख्या जास्त प्रमाणात होती. निळे आणि पांढरे वस्त्र, छातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून अनुयायींनी अत्यंत शांततेने रांगा लावून चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.

आम्ही आंबेडकरवादी

‘आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी’ या संघटनेद्वारे चैत्यभूमी परिसर स्वच्छ करण्यात येत होता. दरवर्षी या संघटेनेचे 1 हजार 200 ते 1 हजार 500 स्वयंसेवक स्वच्छतेचे काम करतात. मात्र, यंदा प्रशासनाची परवानगी मिळाली नसल्याने फक्त 300 स्वयंसेवकांसह चैत्यभूमी परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. यासह यामधील स्वयंसेवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे फलक हातात घेऊन उभे होते. ‘अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही.’ असे बाबासाहेबांचे विचार फलकातून मांडण्यात आले. ‘बौद्ध असल्याचा आम्हां अभिमान, चला करू स्वच्छता जाणीव अभियान’ असे ‘आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी’ या संघटनेद्वारे सांगण्यात येत होते.

Babasaheb Ambedkar
...तर आदित्य ठाकरेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, नितेश राणेंची मागणी

काही ठिकाणी पुस्तक, कॅलेडर विक्री सुरू होती. भारतीय संविधान, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गौरव गाथा,या पुस्तकांची विक्री होत होती. यासह नववर्षांची दिनदर्शिका विक्री केली जात होती.

1 डिसेंबरपासून संपूर्ण आठवडाभर अनुयायांसाठी शिवाजी पार्क खुले केलेले असते. मात्र, यंदा शिवाजी पार्कची जागेवर अनुयायांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा 6 डिसेंबर रोजी तरूणांचे क्रिकेट, हाॅलीबाॅल खेळणे सुरू होते. काही खेळांडूची नेट प्रॅक्टीस सुरू होती. राज्यभरातून येणाऱ्या अनुयायासाठी प्रशासनाने निवाऱ्यांची सुविधा केली नसल्याने अनुयायानी नायलाजाने शिवाजी पार्कमधील नेट लावलेल्या ठिकाणीच बसले.

कोरोना नियमांचे पालन

प्रत्येक अनुयायांकडून कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होते. ज्या अनुयायांने मास्क परिधान केला नसल्याने, इतर अनुयायाकडून, काही सामाजिक संघटनेकडून मास्क वाटप करण्यात आले. चैत्यभूमीत शिरकाव करताना प्रत्येकजण रांगेत उभा होता.

राजकीय पक्षांची, नेत्यांची बॅनरबाजी

प्रत्येक राजकीय पक्षांची आणि नेत्यांची दादर परिसरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यासाठी बॅनर लावले होते. अनेक संघटनाकडून मोफत पाणी, भोजन वाटप करण्यात येत होते.

Babasaheb Ambedkar
OBC आरक्षण : छगन भुजबळांनी प्रशासनावर फोडलं खापर, म्हणाले...

"बाबासाहेबांनी जगण्यासाठी लागणारे पंख दिले. सतत होणाऱ्या अपमानाला, अन्यायाला वाचा फोडण्याचे बळ त्यांनी दिले. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी येणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाने कितीही नियम केले, विशेष रेल्वे सोडल्या नाही, तरी पण आम्ही चैत्यभूमीत आलो."- गुंठाबाई गवांडे, (65) बुलढाणा

"दरवर्षी न चुकता चैत्यभूमी येथे येतो. 16 वर्षाचा असताना चैत्यभूमी येथे येण्यास सुरूवात केली. आता 78 वर्ष वय झाले आहे. तरीही जोपर्यंत जीवंत आहे. तोपर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत राहणार."- उमाजी शिरसाठ, (78) खार

"पूर्वी लाखोंच्या संख्येने येणारे अनुयायी यंदा कमी झाले आहे. यावर्षी बाहेरील राज्यातून येणाऱ्या अनुयायांची संख्या कमी आहे. राज्यभरातील आणि मुंबई महानगरातील अनुयायी जास्त संख्येने 5, 6 डिसेंबर रोजी आले आहेत. पूर्वी डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीपासून ते वरळी नाक्यापर्यंत रांगा लागत होत्या. मात्र, यंदा चैत्यभूमी ते सिद्धीविनायक मंदिर, किर्ती काॅलेजपर्यंत रांगा होत्या." - महेंद्र सोनावणे, सैनिक, समता सैनिक दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com