आकाश भास्करराव देशमुख sakal
अकोला

अकोला : कोकणातील समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू

मृतक शिवसेना आमदार नितीन देशमुखांचा भाचा

सकाळ वृत्तसेवा

अकोला: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर बोट अपघातात अकोल्यातील आकाश भास्करराव देशमुख (वय २७ वर्षे .रा शास्त्री नगर , अकोला) हा युवक मृत्युमुखी पडला. तो शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचा भाचा आहे.

तो बहिणीसह आई, जावयांसोबत मालवण येथे पर्यटनासाठी गेला होता. तो तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरून ‘जय गजानन’ या नावाच्या बोटीने स्कुबा डायव्हिंगसाठी निघाला होता. प्राथमिक माहितीनुसार या बोटीत २० पर्यटक होते. बोट परतीच्या प्रवासाला असताना समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बुडाली. बोट एमटीडीसी रिसॉर्टकडे निघाली होती. या दुर्घटनेत आकाश देशमुखसह पुण्यातील पर्यटकाचा दुर्देवी मृत्यू झाला. सुदैवाने अन्य पर्यटक सुखरूप परतले.

लोकप्रतिनिधींची धाव

दुर्घटनेची माहिती मिळताच भाजपा व शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी आमदार नितीन देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी आमदार देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला. दुर्घटनेची माहिती कळताच शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभेच्या कुडाळ मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला. कोकणातील शिवसेना नेत्यांनी स्थानिक प्रशासनाला पुढील सोपस्कार पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

बोटीवर लाट आदळल्याने अपघात

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेच्या वेळी प्रचंड लाटा उसळत होत्या. त्यातच एक लाट थेट बोटीवर आदळली. त्यामुळे बोट उलटी होऊन दोन-तीन वेळा पाण्यात फिरली. त्यात पर्यटकांच्या नाकातोंडात पाणी गेले.

मोठी बहिण, जावई वाचले!

या दुर्घटनेत आकाश देशमुख यांची मोठी बहीण अश्विनी परब व त्यांचे जावई शैलेश परब या दोघांना वाचण्यात बचाव कार्याला यश आले. मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावर परत येत असतांना शेवटच्या क्षणी हा घात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

स्वप्नील पाठोपाठ सतीश राजवाडेंनीही थांबवला चालू नाटकाचा प्रयोग, 'हे' होतं कारण !

Revdanda Bridge : कोकणचा प्रवास होणार सुपरफास्ट! 1200 कोटींच्या रेवदंडा खाडीपुलाच्या कामाला वेग; वळसा घालून जाण्याचा फेरा वाचणार, कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प?

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT