stock market sakal
अर्थविश्व

केवळ 8 रुपयांच्या स्टॉकचा 27 वर्षात 122 पट परतावा, आता देणार 240%डिव्हिडेंड...

डिव्हिडेंडसाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी, कंपनीने 20 सप्टेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड ( Morganite Crucible (India) कंपनीने त्याच्या भागधारकांना 240 टक्के म्हणजे 12 रुपये प्रति इक्विटी शेअरचा फायनल डिव्हिडेंड देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एजीएममध्ये भागधारकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. डिव्हिडेंडसाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी, कंपनीने 20 सप्टेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2022 पर्यंत सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील. मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड ही 569.44 कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे.  

व्हॅल्यू रिसर्चनुसार, मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी आहे. नुकताच कंपनीचा शेअर बीएसईवर 1.49 टक्क्यांनी वाढून 1,000.05 रुपयांवर बंद झाला.

27 वर्षांपूर्वी  8 रुपये किंमत

लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून हा स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. 14 जुलै 1995 रोजी हा शेअर 8.25 रुपयांवर होता. म्हणजेच गेल्या 27 वर्षांत या शेअरने तब्बल 12,200 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात शेअरने 104.78 टक्के परतावा दिला आहे आणि गेल्या तीन वर्षात हा  स्टॉक 25.54 टक्के वाढला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक फ्लॅट राहिला आहे आणि या वर्षात म्हणजे 2022 मध्ये आतापर्यंत त्याने 8.29 टक्के परतावा दिला आहे.

कंपनी काय करते ?मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड ही कंपनी क्रूसिबल आणि संबंधित रेफ्रेक्ट्री उत्पादने बनवते आणि विकते. औरंगाबादमधील ही कंपनी मॉर्गन ऍडव्हान्स्ड मटेरियल्स लिमिटेडची डिव्हिजन आहे, जी बऱ्याच काळापासून उच्च दर्जाचे क्रूसिबल आणि संबंधित उत्पादने तयार करत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT