modi  sakal
अर्थविश्व

नोटाबंदीच्या ६ वर्षानंतरही लोकांच्या रोख स्वरूपातील चलनात वाढ : आरबीआयचा अहवाल

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹ 500 आणि ₹ 1,000 च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

सकाळ डिजिटल टीम

नोटाबंदीला सहा वर्ष होऊनही लोकांमध्ये रोखीचा वापर अजून वाढत आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत बाजारात ₹30.88 लाख कोटींचेचलन आहे. नोटबंदी नंतर रोख स्वरूपातील चलनाने नवीन उच्चांक गाठला आहे.

लोकांकडे असलेले चलन 4 नोव्हेंबर 2016 रोजी असलेल्या पातळीपेक्षा 71.84 टक्के जास्त आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ₹ 500 आणि ₹ 1,000 च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अर्थव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि काळा पैसा कमी करण्याच्या अंतिम उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा : भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

नोटबंदीच्या खराब नियोजनामुळे आणि अंमलबजावणीसाठी अनेक तज्ञांनी यावर टीका केली होती. नोटाबंदीच्या 6 वर्षानंतर लोकांकडे रोख स्वरूपातील रक्कम ₹30.88 लाख कोटी रुपयांच्या नवीन उच्चांकावर आहे. नोटाबंदीचा हेतू भारताला "लेस कॅश" अर्थव्यवस्था बनवण्याचा होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या पैशांच्या पुरवठ्यावरील आकडेवारीनुसार, 21 ऑक्टोबरपर्यंत लोकांकडील रोख चलन ₹ 30.88 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. रिझर्व्ह मनीच्या केंद्रीय बँकेने 4 नोव्हेंबर 2016 रोजी ₹ 17.7 लाख कोटी रुपये चलनात ठेवले होते.

सार्वजनिक चलन म्हणजे नोटा आणि नाणे जे लोक व्यवहार करण्यासाठी आणि वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरतात. चलनात असलेल्या नोटांमधून बँकांकडे रोख स्वरूपातील रक्कम वजा केल्यावर हा आकडा आला आहे.

पेमेंटचे नवीन आणि अतिशय सोयीचे डिजिटल पर्याय लोकप्रिय झाले असतानाही, अर्थव्यवस्थेत रोखीचा वापर सातत्याने वाढत आहे. कोविड-19 साथीच्या रोगामुळे डिजिटल व्यवहारांवर भर होता. मात्र RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रोख स्वरूपातील चलनात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

मागे एसबीआयच्या अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालात असे म्हटले होते की, लोकांमध्ये डिजिटल पेमेंटच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या संरचनात्मक बदल होत असल्याचेही अहवालात म्हटलेहोते. अहवालानुसार, 2009 मध्ये दिवाळीच्या आठवड्यात चलनात 950 कोटी रुपयांची घसरण झाली होती. परंतु जागतिक मंदीमुळे असे घडले होते. असे तज्ञांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT