Share Market
Share Market  esakal
अर्थविश्व

Share Market : 'या' रबर कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; चार महिन्यात संपत्तीत दुप्पट वाढ

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे सध्या कमजोर दिसत असले तरी लाँग टर्ममध्ये त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे रबर इंडस्ट्रीतील कंपनी ऍपकोटेक्स (Apcotex).

ऍपकोटेक्स च्या शेअर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून घसरण दिसून येत आहे. पण मागच्या 14 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. 80 हजारांपेक्षा कमी गुंतवणुकीमध्ये या शेअरने लोकांना कोट्यधीश बनवले आहे.

केवळ लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. या शेअरने अवघ्या चार महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचे शेअर्स 310 रुपयांवर होते, जे चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 119 टक्क्यांनी वाढून 2 जून 2022 रोजी 678 रुपयांवर पोहोचले.

पण मागच्या ट्रेडिंग आठवड्यात ते 5 टक्क्यांहून अधिक कमजोर झाले असले तरी शुक्रवारी हा शेअर बीएसईवर 442.95 रुपयांवर बंद झाला. त्याची मार्केट कॅप 2,296.47 कोटी रुपये आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

13 मार्च 2009 पर्यंत ऍपकोटेक्सचे (Apcotex) शेअर्स 3.45 रुपयांवर होते. पण आता 14 वर्षांत ते 442.95 रुपयांपर्यंत म्हणजे 129 पट वाढले आहे. याचाच अर्थ त्या वेळी केवळ 78 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

ऍपकोटेक्सनी 1980 मध्ये एशियन पेंट्सचा एक विभाग म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 1991 मध्ये देशांतर्गत बाजारात ही कंपनी लिस्ट झाली आणि 2005 मध्ये ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड असे नामकरण करण्यात आले. ही देशातील सिंथेटिक रबर आणि सिंथेटिक लेटेक्सची आघाडीची उत्पादक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

Moon Express: चंद्राबाबत मोठी बातमी! मून एक्स्प्रेसची तयारी सुरू, नासा चालवणार ट्रेन

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

SCROLL FOR NEXT