अटल पेन्शन योजना  सकाळ डिजिटल टीम
अर्थविश्व

तुम्हाला दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल, फक्त तुम्हाला यासाठी हे करावे लागेल...

केंद्र सरकारने देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे

सकाळ डिजिटल टीम


केंद्र सरकारने देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे.या अंतर्गत, जर एखाद्या पगारदार व्यक्तीने नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत दर महिन्याला थोडीशी रक्कम गुंतवली तर निवृत्तीनंतर त्याला पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळेल. यामुळे त्यांची भविष्याची चिंता मिटेल आणि तसेच त्याचे म्हातारपणाचे शेवटचे दिवसही चांगले जातील. आज या लेखात आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेबद्दल सांगणार आहोत. तसेच दर महिन्याला तुम्ही या योजनेत किती पैसे गुंतवू शकता आणि पुढे किती पेन्शन मिळवू शकता हे देखील सांगणार आहोत.

अटल पेन्शन योजना काय आहे?

ही योजना लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, जर तुम्ही दरमहा थोडीशी रक्कम गुंतवली तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल. 18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये तुम्हाला किमान 1000 आणि कमाल 5000 रुपये पेन्शन मिळते.

दुसरीकडे, जर तुम्ही पती-पत्नीने यामध्ये एकत्रीपणे खाते उघडले तर दोघांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश हा असंघटित कुटुंबांना भक्कम आर्थिक मदत करणे हा आहे.

योजनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?

या योजनेत तुम्हाला ऑटो डेबिटची सुविधा मिळते म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून गुंतवणुकीची रक्कम आपोआप कापली जाईल, यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.समजा या योजनेचा लाभ घेताना लाभार्थीचा 60 वर्षापूर्वीच कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत हयात जोडीदाराला योजना सुरू ठेवावी लागते आणि मग वयाच्या 60 वर्षानंतर तिला पेन्शन मिळते.जर पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर हे पैसे नॉमिनीला दिले जातात. अटल पेन्शन योजनेत तुम्ही 42 रुपये ते 210 रुपये दरमहा जमा करू शकता.किती पैसे गुंतवायचे ही गुंतवणुकीची रक्कम तुमच्या वयावर अवलंबून असते. जर पती-पत्नीचे वय 30 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला दरमहा रु.577 पेन्शन मिळू शकते, जर पती-पत्नीचे वय 35 वर्षे असेल तर तुम्हाला प्रत्येकी 902 रुपये जमा करून रु.10,000 पेन्शन मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT