
Atal Pension Yojana आणि NPS योजनेत गुंतवणूक केल्याचे 'हे' आहेत फायदे
लोकं सेवा निवृत्तीनंतरच्या योजनांविषयी जागरूक होत आहेत. आता तर अनेक लोक विशेषत: तरूणाई सेवानिवृत्ती योजनांबद्दल अधिक जागरूक असतात. असे लोकं नोकरीच्या सुरुवातीपासूनच वृद्धापकाळाच्या खर्चाचे नियोजन करायला लागतात. पेन्शन फंड रेग्युलेटर (पीएफआरडीए) च्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्तेत दरवर्षी 28 टक्क्यांनी वाढ होत आहे.
हेही वाचा: कॅब चालक निघाला Uberचा मालक!
अटल पेन्शन योजना कशी आहे? - या सरकारी योजनेची सुरूवात 2015 करण्यात आली. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू झाली. 18 ते 40 वर्षापर्यंतचा भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत केलेली गुंतवणूक ही वयावर अवलंबून असते. तुम्हाला एक हजार ते पाच हजारापर्यंत किमान मासिक पेन्शन मिळू शकते. ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. यासाठी नोंदणी करायची असल्यास, तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. योजनेनुसार तुम्हाला साठीनंतर पेन्शन मिळणे सुरू होते,
हेही वाचा: ए सखे, तुझे पैसे गुंतविण्याचे हे आहेत की ग मार्ग
संघटीत क्षेत्रातील कामगार NPS शी जोडलेले - नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही सरकारद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणारी एक योजना आहे. या योजनेत वेळोवेळी बदल केले जातात. NPS मध्ये गुंतवणुकीचे कमाल वय 70 वर्षे आहे. म्हणजेच ७० वर्षांपर्यंतची व्यक्ती एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकते. PFRDA ने 60 वर्षानंतर NPS मध्ये सामील झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे, ते आता 75 वर्षे वयापर्यंत NPS खाते सुरू ठेवू शकतात. इतर सर्व सदस्यांसाठी 70 वर्षे मर्यादा आहे.
हेही वाचा: ओ वुमनिया, बक्कळ कमावतेस मग, गुंतवणूक कर की जरा!
तरूणांमध्ये वाढली आर्थिक जागरूकता -तरुणांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याबाबत जागरूकता वाढली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021-22 च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. अटल पेन्शन योजनेत 18-25 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, अटल पेन्शन योजनेत तरुणांचा सहभाग 43 टक्के होता. तर, मार्च 2016 मध्ये तो फक्त 29 टक्के होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 4.94 टक्के आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 9.22 टक्के वाढ झाली आहे. PFRDA नुसार त्यांची संख्या 22.75 लाख आणि 55.44 लाख झाली आहे.
Web Title: Atal Pension Yojana And Nps Subscribers Rise By 23 Percent Asset Under Management Rise
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..