Gautam Adani sakal
अर्थविश्व

Bloomberg Billionaires Index : भारतातल्या 'या' 5 उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ; पाहा पूर्ण यादी

2022 या वर्षात 15 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

Gautam Adani : कोरोनाचा पुन्हा उद्रेक आणि जागतिक पातळीवर मंदीची भीती असताना चीनसह जगातील अनेक देशांमध्ये शेअर बाजारात घसरण झाली आहे. शुक्रवारी गुंतवणूकदारांचे 8.40 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

दुसरीकडे, गौतम अदानी यांना 9.38 अब्ज डॉलर आणि मुकेश अंबानी यांना 2.71 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.

2022 या वर्षात गौतम अदानीसह 5 अब्जाधीशांच्या संपत्तीत जगातील सर्वात श्रीमंतांच्या टॉप 20 यादीत वाढ झाली आहे. तर यावर्षी 15 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात सर्वात मोठी वाढ झाली आहे. उर्वरित 4 अब्जाधीशांच्या संपत्तीत कमी वाढ झाली आहे. जाणून घेऊया टॉप 20 मध्ये कोणाची संपत्ती वाढली आहे.

एलोन मस्कच्या संपत्तीत घसरण :

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्या मालमत्तेत सर्वात मोठी घसरण झाली आहे. या वर्षी, एलोन मस्कच्या संपत्तीत 132 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे, तर त्यांची एकूण संपत्ती सध्या 139 अब्ज डॉलर आहे.

इलॉन मस्क यांचे एका दिवसात 1.57 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती या वर्षी 18.9 अब्ज डॉलरने कमी होऊन 159 अब्ज डॉलर झाली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्या संपत्तीत घसरण :

टॉप 5 अब्जाधीशांच्या यादीत असलेले बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीतही मोठी घसरण झाली आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्सची संपत्ती 109 अब्ज डॉलर आहे,

जी यावर्षी 28.7 बिलियन डॉलरने घसरली आहे. याशिवाय जेफ बेझोस यांची संपत्ती 84.1अब्ज डॉलरने घसरून 108 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

गौतम अदानीसह 'या' पाच जणांची संपत्तीत वाढ :

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या टॉप 20 मध्ये गौतम अदानी यांच्या मालमत्तेत यावर्षी सर्वाधिक नफा झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 33.8 अब्ज वरून 110 बिलियन डॉलर झाली आहे.

यानंतर मेक्सिकन अब्जाधीश कार्लोस स्लिम यांच्या संपत्तीत 3.26 अब्ज डॉलरची वाढ झाली असून आता त्यांची एकूण संपत्ती 77 अब्ज डॉलर झाली आहे.

तिसर्‍या क्रमांकावर असलेले यूएस अब्जाधीश चार्ल्स कोच यांच्या संपत्तीत यावर्षी 6.17 अब्ज डॉलरची वाढ झाली असून आता त्यांची एकूण संपत्ती 67.4 अब्ज डॉलर झाली आहे. टॉप 20 मध्ये चौथे अब्जाधीश ज्युलिया फ्लेशर कोच आहेत, ज्यांच्या संपत्तीमध्ये यावर्षी वाढ झाली आहे.

यूएस उद्योजकाच्या संपत्तीत यावर्षी 6.17 अब्ज डॉलरची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 67.4 अब्ज डॉलर आहे. पाचव्या क्रमांकावर असलेल्या जॅकलिन बॅजर मार्सच्या संपत्तीत यावर्षी 4.28 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि आता तिची एकूण संपत्ती 55.4 अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT