PSQ Stock esakal
अर्थविश्व

PSQ Stock : या स्टॉकने 3 महिन्यात दुप्पट केली गुंतवणूक

आता कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारांसाठी प्रति शेअर 7 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Cochin Shipyard Ltd PSQ Stock : कोचीन शिपयार्ड लिमिटेडचा शेअर अगदी शॉर्ट टर्ममध्येही गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 3 महिन्यात दुप्पट झाली आहे. आता कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारांसाठी प्रति शेअर 7 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

कोचीन शिपयार्डच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरसाठी 70 टक्के अर्थात 7 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. यासाठी 22 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

एक महिन्यात 28 टक्के वाढ

कोचीन शिपयार्डचे मार्केट व्हॅल्युएशन अंदाजे 8,800 कोटी रुपये आहे. कोचीन शिपयार्ड ही औद्योगिक क्षेत्रातली मध्यम आकाराची सरकारी मालकीची कंपनी आहे. कंपनीने गेल्या 3 महिन्यांत जवळपास 100% मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

कोचीन शिपयार्डचा शेअर यावर्षी 16 ऑगस्टला बीएसईवर 335 रुपयांवर बंद झाला आणि 14 ऑगस्ट 2022 रोजी 669.55 रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी या स्टॉकने गेल्या एका वर्षात 80 टक्के, सहा महिन्यांत 113 टक्के आणि एका महिन्यात 28 टक्के परतावा दिला आहे.

रेव्हेन्यूत घसरण

शिपबिल्डिंग सेग्मेंटमधील संथ वाढीमुळे, कंपनीचा महसूल सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत वार्षिक 1.9 टक्क्यांनी घसरून 683 कोटी रुपयांवर आला. तिमाही आधारावर महसूल 55 टक्के जास्त असला तरी. शिप बिल्डिंग सेग्मेंटच्या मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे एबीटी ही वार्षिक आधारावर 3.82 टक्क्यांनी घसरला.

कोचीन शिपयार्ड ही सरकारी कंपनी आहे. ही देशातील सर्वात मोठी जहाज बनवणारी आणि मेंटेनेंस करणारी कंपनी आहे. यार्डमध्ये दरवर्षी 1.1 लाख टन जहाजे बांधण्याची आणि वार्षिक 1.25 लाख टन जहाजांची दुरुस्ती करण्याची सुविधा आहे. याला केवळ देशातूनच नव्हे तर युरोप आणि मिडिल- ईस्टच्या आघाडीच्या कंपन्यांकडून जहाजबांधणीचे ऑर्डर मिळत असतात.

कंपनीला भारतीय नौदलाकडूनही ऑर्डर मिळतात. पुढील पिढीच्यामिसाइल वेसेल्ससाठी नौदलाशी बोलणी सध्या अंतिम टप्प्यात असून कंपनीला लवकरच त्याची ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात या शेअर्समध्ये आणखी तेजी दिसून येईल अशी खात्री बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT