Share Market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? | Pre Analysis of Share Market | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

विकली एक्सपायरीआधी बाजार कंसोलिडेशनच्या मूडमध्ये राहिला. सेन्सेक्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. सेन्सेक्स 108 अंकांनी वाढून 61981 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 6 अंकांनी वर चढून 18410 वर बंद झाला आहे.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवर दबाव होता. शुगर, रेल्वे आणि डिफेन्स सेक्टरमध्ये तेजी दिसली. बँकिंग, आयटी शेअर्सव काहीशी खरेदी झाली. मेटल, रियल्टी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. इन्फ्रा, ऑटो, फार्मा शेअर्सवर दबाव दिसून आला. (Pre Analysis of Share Market Update 17 November 2022 )

हेही वाचा: Liquor stocks :व्होडका-व्हिस्की विकणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल...

निफ्टी बँक 163 अंकांनी वाढून 42535 वर बंद झाला. मिडकॅप 206 अंकांनी घसरून 31198 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 30 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचेे 12 पैकी 7 शेअर्स घसरले.

हेही वाचा: Stock Market Closing : सेन्सेक्स 59,959 वर बंद, 'या' क्षेत्रामध्ये झाली घसरण

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

शेअर बाजार गुरुवारी साईडवेज मुव्हमेंटसह एका रेंजमध्ये व्यापार करताना दिसत होता. पण शेवटच्या ट्रेडिंग तासात निवडक शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.  आशियाई आणि युरोपीय बाजारातील मंदीमुळे भारतीय गुंतवणूकदारही सावध दिसले.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 108 अंकांनी खाली

गेल्या आठवड्यातील मजबूत रॅलीनंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेत चांगली चिन्हे असूनही गुंतवणूकदार खरेदीसाठी घाई करण्याच्या मूडमध्ये नाहीत. तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर एक छोटी डोजी कँडल तयार केली आहे.

सध्या बाजाराची दिशा स्पष्टपणे दिसत नाही. आता जर निफ्टी 18450 च्या वर गेला तरच त्याला नवीन गती मिळेल. याच्या वर गेल्यास निफ्टीमध्ये 18550-18600 ची पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी 18350 च्या खाली घसरला तर निफ्टी 18250-18200 च्या दिशेने जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

कोटक बॉँक (KOTAKBANK)
रोल इंडिया (COALINDIA)
एचडीएफसी (HDFC)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
टीसीएस (TCS)
एचडीएफसी बँक (HDFCBANK)
पीएनबी (PNB)
बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.