stock market sakal
अर्थविश्व

दीर्घकालीन गुंतवणूक करताय? Multibagger IT Stock उत्तम पर्याय

सुमित बागुल

Mulitbagger Stocks: एप्रिल २०२० मधील निचांकी पातळीवरून एनएसई निफ्टी आता दुप्पट झाला आहे. या दरम्यान, सर्व स्मॉलकॅप, मिडकॅप समभाग विक्रमी उच्चांकावर आहेत. या तेजीमध्ये अनेक समभागांनी तगडा परतावा (Return) दिला आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही या मल्टीबॅगर (Mulitbagger) आयटी स्टॉकचा विचार केला आहे का?

आम्ही Mindtree च्या शेअर्सबाबत बोलत आहोत. मागच्या 10 वर्षांत या IT स्टॉकने 4000% रिटर्न दिले आहेत. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. मागच्या 10 वर्षांत Mindtree चे शेअर्स 81.75 रुपयांवरुन 3355.40 रुपयांवर पोहोचले आहेत.

केवळ 5 ट्रेडिंग सत्रांत Mindtree च्या शेअर्सच्या किंमती 2930 रुपयांवरुन 3355.40 रुपये झाल्यात. मागच्या एका महिन्यात या शेअर्सचे भाव 2762.95 रुपयांनी वाढून 3355.40 रुपये झालेत. मागच्या 6 महिन्यातही Mindtree च्या शेअर्सने रेकॉर्डब्रेक परतावा दिला आहे. या 6 महिन्यात या IT कंपनीचे शेअर्स 1614.55 रुपयांवरुन 3355.40 रुपये झाले. या दरम्यान कंपनीने 107 टक्के परतावा दिला आहे.

मागच्या एका वर्षांत Mindtree च्या शेअर्सने 185 टक्के परतावा दिला आहे. तर मागच्या 5 वर्षांचा विचार केल्यास Mindtree ने 486% परतावा दिला आहे. या दरम्यान Mindtree चे शेअर्स 569.25 रुपयांनी वाढून 3355.40 रुपयांवर पोहोचले. पण मागच्या 10 वर्षांचा विचार केल्यास Mindtree च्या शेअर्सने रेकॉर्डतोड 4000% परतावा दिला आहे. या दरम्यान Mindtree चे शेअर्स 81.75 रुपयांनी वाढून 3355.40 रुपयांवर पोहोचले.

जर 10 वर्षांपुर्वी तुम्ही Mindtree च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केल असते तर आज त्याची किंमत तब्बल 41 लाख रुपये झाली असती, जर तुम्ही 5 वर्षांपुर्वी Mindtree च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ही गुंतवणूक 5.86 लाख रुपये इतकी झाली असती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT