esakal | वर्क फ्रॉम होम करताय? कंबरदुखी टाळण्यासाठी करा हे उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

back pain.

वर्क फ्रॉम होम करताय? कंबरदुखी टाळण्यासाठी करा हे उपाय

sakal_logo
By
शरयू काकडे

कोरोनाकाळात आपल्या सर्वांसाठीच ऑफिसची व्याख्याच बदलून गेली आहे. वर्क फ्रॉम होममुळे ऑफिसला जाण्या-येण्याचा वेळ वाचला तरी खूर्ची आणि टेबल नसल्यामुळे आपण बऱ्याचदा काम करताना अवघडून जातो. काम करताना आपण नीट बसून काम केले नाही तर त्याचे दुष्परिणाम होत असतात. चूकीच्या पध्दतीने बसून काम केल्यास स्नायू कमकुवत होतात आणि सतत वेदना जाणवत राहतात. कामाच्या दरम्यान अनेकदा आपल्या पाठीला आणि मानेला चूकीच्या पध्दतीने बसण्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

सध्या धावपळीची जीवनशैली आणि आपल्या चुकीच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीमुळे कंबरदुखीचा त्रास वाढला आहे. आपल्यापैकी बहुतांश लोक डेस्कऐवजी सोफ्यावर बसून काम करू लागले आहेत ज्यामुळे काम करताना बसण्याच्या योग्य पध्दतीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकांमध्ये कंबरदुखी वाढण्यामागे हे मुख्य कारण आहे.

हेही वाचा: आरोग्याची कोणती समस्या तुम्हाला येऊ शकते? वाचा Numerologyच्या नजरेतून

वर्क फ्रॉम होम करताना कंबरदुखी टाळायची असेल तर या सोप्या टीप्स फॉलो करा

ऑफिस चेअर/ खुर्ची वापरा

वर्क फ्रॉम होम करताना कित्येक जणांकडे ऑफिस सारखे डेस्क आणि चेअर/ खुर्ची नसते. पुन्हा सर्व काही नॉर्मल कधी होईल हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण एखादी चांगल्या चेअर/ खुर्ची खरेदी करणे गरजेचे आहे. जर हे शक्य नसेल तर तुम्ही डायनिंग टेबल आणि खूर्चीचा वापर करू शकता. सोफा आणि बेडवर बसून काम करणे सर्वांनी टाळले पाहिजे.

काम करताना पाठीला आधार द्या

आपला पाठीचा कणा एस-आकाराचा असतो, परंतु जेव्हा आपण बेड किंवा सोफ्यावर बसतो तेव्हा तो सी-आकार बनतो, तेव्हा पाठीवर आणि मानेवर ताण येतो. अशा वेळी काम करताना कमरेला आधार देण्यासाठी लंबर रोल वापरता येईल आणि जर ते शक्य नसेल तर, टॉवेल रोल किंवा लहान उशी आधारासाठी पाठीमागे ठेवता येते.

हेही वाचा: TVS Apache RTR 160 4V गाडी झाली महाग; जाणून घ्या कितीने वाढली किंमत

काम करताना बसण्याची योग्य पध्दत

काम करताना कंबरेपासून वर खांद्यापर्यंतचा भाग ९० अंशाच्या कोनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कामासाठी बसताना तुमचे गुडखे तुमच्या कंबरेच्या लेव्हलपेक्षा खाली असावेत. कामासाठी बसताना तुमची पध्दत व्यवस्थित नसल्यास त्याचा परिणाम तुमच्या कंबरेवर होतो आणि समस्या निर्माण होऊ शकतात. काम करताना तुमची कंबर योग्य पध्दतीने नसेल तर त्याचा ताण तुमच्या मानेवर येतो, त्यामुळे योग्य पध्दतीने बसा.

पुढे वाकून बसू नका

जेव्हा तुम्ही खूर्चीवर बसता तेव्हा तुम्ही मागे टेकून बसले आहात ना याची खात्री करा. बहुदा आपण समोर वाकून बसतो पण ते अत्यंत चूकीचे आहे. आपल्या कंबरे खालचा आणि वरचा भाग खूर्चीला ९० अंशाच्या कोनामध्ये खुर्चीला टेकलेला असला पाहिजे.

हेही वाचा: रात्रीची नीट झोप लागत नाही? फॉलो करा सोप्या टिप्स

पायांमध्ये अंतर राखा

काम करायला बसताना दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक काम करताना पुढे वाकून बसतात तेव्हा दोन पायांमध्ये पुरेसे अंतर ठेवत नाही त्यामुळे कंबरेवरचा ताण वाढतो.

लॅपटॉप स्टँड

जर तुम्हाला लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवून काम करण्याची सवय असेल, तर ती देखील चुकीची सवय आहे कारण त्यामुळे आपण आपली पाठ आणि मान वाकून काम करतो. त्यापेक्षा तुम्ही जर लॅपटॉप स्टॅन्ड वापरा. लॅपटॉप डोळ्यांच्या लेव्हलला ठेवून वापरा, जर लॅपटॉप स्टँड नसेल जर जाडसर पुस्तके वापरून लॅपटॉप डोळ्यांच्या लेव्हलला ठेवून काम करा.

हेही वाचा: साडीमध्ये स्टायलिश आणि स्लिम दिसायचंय या गोष्टींकडे द्या लक्ष

ठराविक वेळाने ब्रेक घ्या

वर्क फ्रॉम करताना, दर ३५-४० मिनिंटानी छोटा ब्रेक घ्यावा. थोड्या वेळ अंग किंवा पाय मोकळे करण्यासाठी हा ब्रेक घ्यावा. छोटया सोफ्यावर बसणे शक्यतो टाळा कारण त्यामुळे तुमच्या कंबरेवर ताण येऊ शकतो.

नियमित चालणे फायदेशीर

सहसा अॅरोबिक्स एक्सरसाईजमुळे तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. पण नियमित चालण्यामुळे, स्विमिंगमुळे किंवा सायकलिंगमुळे शरीराला फायदा होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

loading image
go to top