gold hallmarking sakal media
अर्थविश्व

सोने व्यावसायिकांच्या बंदला देशभरात चांगला प्रतिसाद ; संघटनेचा दावा

हॉलमार्क व एचयूआयडीला विरोध

कृष्ण जोशी

मुंबई : सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क (gold hallmark) तसेच हॉलमार्क युनीक आयडीकोड (hallmark unique id must) सक्तीचे करण्याच्या केंद्र सरकारच्या नियमांविरोधात (central government rules) देशभरातील सोने व्यावसायिकांनी (gold traders) केलेल्या संपाला (strike) चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांच्या संघटनांनी केला आहे. केवळ मुंबईतील जव्हेरी बाजारमधील (Zaveri market) इमिटेशन ज्वेलरीचे काम करणाऱ्या व्यावसायिकांनी आज नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवले होते. देशातील सोन्याच्या मोठ्या ब्रँडची काही दुकाने सुरु होती.

यासंदर्भात देशातील सुवर्णकार संघटनांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्सतर्फे या संपाची हाक देण्यात आली होती. आज देशभरातील प्रमुख सोन्याच्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या हाकेला चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती टास्क फोर्स च्या कोअर कमिटीचे सदस्य दिनेश जैन यांनी सकाळ ला दिली. मुंबईतही अनेक दुकाने सकाळी सुरु झाली होती, मात्र नंतर बंद चे आवाहन करण्यात आल्याने आम्हीही दुकाने बंद ठेवली असे गिरगावच्या विष्णू सखाराम ज्वेलर्सचे पुरुषोत्तम काळे यांनी सकाळ ला सांगितले.

महाराष्ट्रात बंद ला 95 टक्के प्रतिसाद मिळाला, मुंबईतही बहुसंख्य दुकाने बंद होती. फक्त गोंदिया जिल्ह्यात सध्या हॉलमार्कची सक्ती असल्याने तेथे बंद नव्हता, असे टास्क फोर्सचे सदस्य व महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फतेहचंद रांका यांनी सकाळ ला सांगितले. वामन हरी पेठे ज्वेलर्सची सगळी दुकाने बंद होती, असे आशिष पेठे यांनी सांगितले.

सोने व्यावसायिकांसमोरील अडचणींना आम्ही वाचा फोडली आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाची आम्हाला सहानुभूती आहे, मात्र अंमलबजावणी करणारे अधिकारी व ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आमच्या मागण्या अजून मान्य करीत नाहीत. इतर उद्योगांपेक्षा सोने उद्योगाचे प्रश्न वेगळे आहेत. हॉलमार्क एकवेळ ठीक आहे, पण एचयूआयडी ची सक्ती नको. त्यामुळे सरकारने यासंदर्भात त्रयस्थ मान्यवर व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करावी. त्यात ग्राहक संघटना, सोने व्यावसायिक, सरकार यांचे प्रतिनिधी असावेत व त्या समितीने याप्रश्नी निर्णय द्यावा, अशी मागणी दिनेश जैन यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT