...म्हणून 'CCI' चा मारुतीला 200 कोटींचा दंड!

Maruti-Suzuki-India
Maruti-Suzuki-Indiasakal media
Updated on

मुंबई : मोटारींवर जादा सवलती (discount on vehicle) जाहीर करण्यास डीलरना प्रतिबंध केल्याबद्दल मारुती सुझुकी (maruti suzuki) इंडिया लि. ला काँपिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने 200 कोटी रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. स्पर्धा कायद्याचा भंग (break the law) केल्याचा ठपका मारुती वर ठेवण्यात आला आहे. सीसीआय ने आजच हा आदेश दिला आहे. स्पर्धात्मक वातावरणाविरोधात वागून व्यवसाय केल्याबद्दल मारुतीला ही शिक्षा ठोठावण्यात (punishment for Maruti) आली आहे. तसेच पुन्हा अशी कृती न करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे.

Maruti-Suzuki-India
'मी असतो तर कानाखालीच चढवली असती', राणेंची जीभ घसरली

मारुती ने आपल्या मोटारींवर जेवढे डिस्काऊंट ऑफर केले होते, त्यापेक्षा जास्त सवलती देण्यास मारुतीने आपल्या डीलरना करारान्वये प्रतिबंध केला होता. डीलरना काही जादा डिस्काऊंट जाहीर करायची असतील तर त्यासाठी मारुती ची पूर्वसंमती बंधकारक केली होती. या अटीचा भंग करणाऱ्या डीलरच्या कंपनीवर तसेच वैयक्तिकरित्या विक्रेते, विभागीय व्यवस्थापक, शोरुम चे व्यवस्थापक, टीम लीडर आदींवर दंड आकारला जाईल, अशीही तंबी देण्यात आली होती. या आरोपांसंदर्भात सीसीआय ने 2019 मध्ये चौकशी सुरु केली होती. असे करून मारुतीने विक्रेत्यांमधील स्पर्धा संपुष्टात आणलीच पण ग्राहकांनाही जादा सवलती नाकारून त्यांचे नुकसान केले, असे मत सीसीआय ने व्यक्त केले.

यासंदर्भात एका विक्रेत्याने पाठविलेल्या गोपनीय इमेल मुळे हा प्रकार उघडकीस आला. विक्रेते आपली ही अट पाळतात की नाही हे तपासण्यासाठी मारुती तर्फे विक्रेत्यांकडे बोगस कारग्राहक पाठवून डिस्काउंटबाबत तपासणीही केली जात असे. नियमभंग करणाऱ्यांवर आर्थिक दंडही लादला जात असे किंवा त्यांचा मोटारींचा पुरवठाही थांबविला जाईल, अशी तंबीही दिली जात असल्याचे सीसीआय ला आढळून आले. त्यामुळे मारुती चे हे कृत्य काँपिटिशन अॅक्ट 2002 च्या विरुद्ध असल्याचा निष्कर्ष सीसीआय ने काढला. तर आम्ही याप्रकरणी कायद्यानुसार कार्यवाही करू, आम्ही नेहमीच ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, अशी प्रतिक्रिया मारुती ने याप्रकरणी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com