Share Market Sakal
अर्थविश्व

मार्केट क्लासरूम : शेअर बाजारातील घाऊक व्यवहार

शेअर बाजारामधील दररोजचे व्यवहार अचंबित करणारे असतात. बीएसई आणि एनएसई यांवरील वेगळेवेगळे; पण एकूण व्यवहार कित्येक लाखांचे आणि कित्येक कोट्यवधी रुपयांचे असतात.

गोपाळ गलगली

शेअर बाजारामधील दररोजचे व्यवहार अचंबित करणारे असतात. बीएसई आणि एनएसई यांवरील वेगळेवेगळे; पण एकूण व्यवहार कित्येक लाखांचे आणि कित्येक कोट्यवधी रुपयांचे असतात. उदा. १४ सप्टेंबरला ‘बीएसई’वर ७५५८ लाख शेअरचे झाले. या उलाढालीचे मूल्य ६०७४ कोटी रुपयांची होते. हेच ‘एनएसई’वरचे आकडे ३७६७६ लाख शेअर आणि त्यांचे मूल्य ६७३८४ कोटी रुपये होते. या दोन्ही एक्चेंजवरील व्यवहारांची बेरीज केली तर या अगडबंब व्यवहारांची कल्पना येऊ शकेल. हेही लक्षात घ्यावे लागेल, की या दररोजच्या व्यवहारातून सरकार, ब्रोकर आणि गुंतवणूकदार लाखो रूपये कमवित असतात.

तुम्ही-आम्ही फार तर १००, ५००, १००० शेअरचा हजारांचा किंवा लाख रुपयांचा व्यवहार करीत असू. पण असे किरकोळ व्यवहार कमी असतात. परंतु, दुसरीकडे मोठमोठे लक्षावधी शेअरचे घाऊक व्यवहार देखील होत असतात. असे दोन प्रकारचे व्यवहार आहेत- ‘बल्क’ किंवा ‘ब्लॉक’. मोठमोठ्या परकी वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड, श्रीमंत गुंतवणूकदार असे लाखो, कोट्यवधी रुपयांचे कोट्यवधी व्यवहार किंवा ‘बल्क’ किंवा ‘ब्लॉक डील’ करीत असतात.

‘बल्क डील’ ः एखाद्या शेअरमध्ये एका किंवा अनेक व्यवहारात त्या शेअरच्या एकूण संख्येच्या ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअरचा व्यवहार होत असेल, तर त्याला ‘बल्क डील’ म्हणतात. असे व्यवहार ‘ब्लॉक ट्रेडिंग विंडो’मधून किंवा दिवसाच्या व्यवहारातून होत असतात आणि ते लगेच एक्चेंजला कळवावे लागतात.

‘ब्लॉक डील’ - या व्यवहारात एखाद्या कंपनीचे पाच लाखांपेक्षा जास्त किंवा रू. पाच कोटींपेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार येतात. यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवण्यात आली आहे. सकाळी बाजार सुरु झाल्यापासून ३५ मिनिटे यासाठी राखून ठेवलेली असतात. मात्र, शेअरच्या किंमतीवर बंधन असते. ते असे, की शेअरची किंमत या ३५ मिनिटांत आदल्या दिवशीच्या बंद भावापेक्षा किंवा त्या दिवशीच्या खुलत्या भावापेक्षा एक टक्का कमी वा जास्त असता कामा नये.

सकाळी जेव्हा आपण बाजार बघत असतो, त्यावेळी अशा व्यवहाराची नोंद पाहायला मिळत असते. त्यामुळे ज्या शेअरमधे असे व्यवहार होत असतात, त्यांचे भाव खाली-वर होत असतात. मात्र, काही कंपन्या ०.५ टक्क्यांपेक्षा थोडा व्यवहार कमी करून या नियमापासून दूर राहताना दिसतात.

(लेखक शेअर बाजाराचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT