esakal | झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 159 टक्क्यांची तुफानी वाढ...
sakal

बोलून बातमी शोधा

Shares

गेल्या 1 महिन्यात झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये दोन पटींनी वाढ झाली आहे.

झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 159 टक्क्यांची वाढ...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

डिफेन्स ट्रेनिंग सोल्युशन्स देणाऱ्या झेन टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. हा शेअर BSE च्या टॉप 10 शेअर्सपैकी एक आहे. 24 ऑगस्ट रोजी हा स्टॉक 83.05 रुपयांवर होता. तर 27 सप्टेंबरला तो 215 रुपयांवर बंद झाला. या काळात हा स्टॉक 159 टक्क्यांनी वाढला. 15 सप्टेंबरला हा शेअर 237.35 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.

BSE वर झेन टेक्नॉलॉजीजची मार्केट कॅप 1,709.47 कोटी रुपये आहे. सध्या हा शेअर सर्वात जास्त नफ्यात आहे. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये समाविष्ट केलेला हा एकमेव स्टॉक आहे, ज्यात गेल्या 1 महिन्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याच काळात सेन्सेक्स 7.4 टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स केवळ 8.5 टक्के वाढला आहे.

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठीचे कमाल स्टॉक्स, टारगेट आणि स्टॉप लॉस किती ठेवावा?

झेन टेक्नॉलॉजीज हैदराबाद स्थित कंपनी आहे. हे मिलिटरी ट्रेनिंग सिम्युलेटर, ड्रायव्हिंग सिम्युलेटर, लाइव्ह रेंड इक्विपमेंट्स आणि ड्रोन-विरोधी प्रणाली तयार करते. कंपनीची स्थापना 1993 मध्ये झाली. त्याने 90 प्रोडक्ट पेटंट्स दाखल केले आहेत. कंपनीने जगभरात 1,000 हून अधिक ट्रेनिंग सिस्टम सप्लाय केल्या आहेत. कंपनीचे अमेरिकेतही बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिस आहे.

झेन टेक्नॉलॉजीच्या शेअर्सच्या वाढीची कारणे

देशात ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने घेतलेली पावले आणि कंपनीची मजबूत ऑर्डर बुक ही या शेअर मागच्या वाढीची प्रमुख कारणे आहेत. केंद्र सरकारने 15 सप्टेंबर रोजी देशात ड्रोन आणि त्यांच्या घटकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 120 कोटी रुपयांची पीएलआय योजना (production-linked incentive scheme) मंजूर केली.

हेही वाचा: गुंतवणुकीसाठी अत्यंत दमदार स्कीम, 20 वर्षात 42 पट परतावा...

झेन टेकचे शेअर्स भविष्यात आणखी तेजीत राहतील असा विश्वास स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीना यांना आहे. या शेअरसाठी 230 रुपयांवर इमीजिएट रझिस्टंस आहे. ही लेव्हल ओलांडली की हा शेअर थेट 275 रुपयांवर जाऊ शकतो असेही ते म्हणाले. दुसरीकडे, जर हा शेअर 230 रुपयांच्या खाली आला तर हा शेअर थेट 160 रुपयांवर जाईल. पण या स्टॉकमध्ये घट जरी झाली तरी तो पुढे वाढेल, पण शेअर्स खाली आल्यावर खरेदी करायची नामी संधी चुकवू नका असा सल्लाही संतोष मीना यांनी दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top