Anand Mahindra Sakal
अर्थविश्व

RBI E-Rupee : आनंद महिंद्रा यांनी आरबीआयच्या ई-रुपीद्वारे केले पहिले पेमेंट; व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anand Mahindra Twitter Video : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल चलन सुरू केले आहे. सध्या देशात काही निवडक ठिकाणीच डिजिटल चलन वापरले जात आहे.

विशेष म्हणजे RBI ने डिजिटल रुपी पायलट प्रोजेक्टमध्ये मुंबईतील एका फळ विक्रेत्याचा समावेश केला आहे.

देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी बुधवारी या प्रकल्पाचा एक भाग बनून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

RBI चे डिजिटल रुपी चलन सुरु झाले आहे आणि आता त्याद्वारे पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले की, त्यांनी ई-रुपीद्वारे पहिले पेमेंट केले आहे. या ई-रुपीची चाचणी करताना आनंद महिंद्रा यांनी फळे खरेदी केली आहेत.

ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बचेलाल साहनी सध्या खूप चर्चेत आहेत, कारण आरबीआयने त्यांना डिजिटल रुपी पायलट योजनेचा भाग बनवले आहे.

बचेलाल साहनी हे मूळचे बिहारचे आहेत. 29 वर्षांपासून ते आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयासमोर फळे विकत आहेत.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. महिंद्रा यांनी ट्विटरवर बचेलाल साहनी या फळ विक्रेत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्या विक्रेत्याकडून फळे विकत घेतली आणि डिजिटल चलन ई-फॉर्मने पैसे दिले.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मला आरबीआयच्या डिजिटल चलन ई-रुपीबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.

या भेटीनंतर लगेच, मी बचेलाल साहनी यांच्याकडे गेलो, जे जवळच फळे विकतात आणि डिजिटल रुपया स्वीकारणाऱ्या देशातील पहिल्या काही व्यापाऱ्यांपैकी एक आहेत.

हेही वाचा : Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं?

RBI ने 2 प्रकारचे डिजिटल चलन जारी केले आहे. एक CBDC-W आणि दुसरा CBDC-R. पहिला घाऊक पेमेंटसाठी वापरला जाईल आणि दुसरा CBDC किरकोळ पेमेंटसाठी वापरला जाईल.

जरी ते अद्याप प्रायोगिक असले तरी, अनेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही. सध्या मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथील लोकांना डिजिटल रुपी वापरण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT