Todays Share Market Updates
Todays Share Market Updates google
अर्थविश्व

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार १४०० अंकांनी कोसळला

नमिता धुरी

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला. रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने बँकांची कर्जे महागली असून त्याचा परिणाम बँकांच्या शेअर्सवर झाला आहे. जागतिक बाजारातील पडझडीचा परिणामही येथे दिसून आला.(Todays Share Market Updates)

गेल्या कित्येक दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकांतून दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स ५२,९४७.६६ वर होता. येथे -१३५५.७८ अंकांची म्हणजेच -२.५० टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीतही -३८७.३० म्हणजेच -२.३९ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे निफ्टी -१५.८२१ वर स्थिर होता.

आपण सध्या मंदीच्या स्थितीत असल्याचे कॅटॅलिस्ट वेल्थचे प्रशांत सावंत म्हणाले. निफ्टीही १६ हजार ६०० च्या पातळीवर पोहोचलेला नाही. १६ हजार ५०० च्या पातळीवर मोठा रझिस्टंस दिसून येत आहे. म्हणूनच सध्या ते नो ट्रेड झोनमध्ये असल्याचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

जोपर्यंत निफ्टी १६ हजार २०० च्या खाली जात नाही, तोपर्यंत त्यात एक पुलआउट दिसू शकतो. १६ हजार ५०० ते १६ हजार ६०० मधील पातळी दिसल्यास, तुम्ही नफा बुक (Profit Booking) केला पाहिजे. जोपर्यंत तो या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रेड करु नका असा सल्ला त्यांनी दिला.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. शुक्रवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी (Nifty) घसरणीसह लाल रंगात बंद झाले होते. सेन्सेक्स -१०१६.८४ अंकांनी म्हणजेच -१.८४ टक्क्यांनी घसरला होता आणि हा निर्देशांक ५४,३०३.४४ च्या पातळीवर बंद झाला होता. याशिवाय निफ्टी -२७६.३० अंकांनी म्हणजेच -१.६८ टक्क्यांनी कमी झाला होता आणि हा निर्देशांक १६२०१.८० वर बंद झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT