Russia Ukraine Crisis Impact on Share Market ANI
अर्थविश्व

रशिया-युक्रेन युद्धाचे शेअर बाजारावर वाईट परिणाम, आज काय असेल स्थिती?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

शिल्पा गुजर

कच्च्या तेलाच्या किमती 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यात. त्यामुळे बाजारात चांगलीच घसरण झाली.

कमोडिटी किंमतीत वाढ, शिवाय महागाई वाढण्याच्या भीतीने सोमवारी शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण झाली. कच्च्या तेलाच्या किमती 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यात. त्यामुळे बाजारात चांगलीच घसरण झाली. याशिवाय रुपयानेही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77 रुपयांचा नीचांक गाठला आहे. सोमवारी सलग पाचव्या दिवशी बाजारात घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स (Sensex) 1491.06 अंकांनी म्हणजेच 2.74 टक्क्यांनी घसरून 52,842.75 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 382.20 अंकांनी म्हणजेच 2.35 टक्क्यांनी घसरून 15,863.15 वर बंद झाला.

बाजारासाठी हा खरंच काळा सोमवार ठरला. निफ्टीने (Nifty) सात महिन्यांच्या नीचांक गाठला. सोमवारच्या व्यवसायात बँकिंग, फायनांशियल, ऑटो, एफएमसीजी आणि इंडेक्स हेवी वेट रिलायन्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

सोमवारच्या एका दिवसात झालेल्या घसरणीत गुंतवणूकदारांचे 5.68 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि बीएसईचे मार्केट कॅप गेल्या शुक्रवारी 246.8 लाख कोटी रुपयांवरून 241.1 लाख कोटी रुपयांवर आले. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतची घसरण पाहिली, तर आतापर्यंत बाजारात 29 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दरम्यान, बाजार त्याच्या ऑक्टोबर 2021 च्या उच्चांकापासून सुमारे 15 टक्क्यांनी तुटला आहे.

मंगळवारी शेअर बाजारात कशी स्थिती असेल ?

रशिया आणि युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे जागतिक आणि भारतीय दोन्ही बाजारांमध्ये मोठी घसरण होत असल्याचे आयसीआयसीआय डायरेक्टचे पंकज पांडे म्हणाले. कच्च्या तेलाच्या किंमती अशाच चढ्या राहिल्यास भारताची चालू खात्यातील तूट वाढेल. यासोबतच, भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करत असल्याने देशाची वित्तीय तूटही वाढणार आहे. बाजारातील अस्थिरता नजीकच्या काळात कायम राहील असेही ते म्हणाले. पण सध्या बाजारात जी घसरण सुरु आहे, ती शेअर्स खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचा सल्ला त्यांनी दिला. मेटल, आयटी, फार्मा येत्या काळात चांगली वाढ कमावून देतील असेही आयसीआयसीआय डायरेक्टचे पंकज पांडे यांनी सांगितले.

कच्च्या तेलात झालेली वाढ आणि रशियावर आणखी निर्बंध लादण्याची शक्यता यामुळे बाजार दबावाखाली दिसत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत, अशा स्थितीत बाजारात प्रचंड चढउतार होणार आहेत. देशांतर्गत बाजाराबाबत बोलायचे झाले तर राज्याच्या निवडणुकांचे एक्झिट पोल आणि 10 मार्च रोजी येणार्‍या निवडणूक निकालांवर बाजाराची नजर असेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- ओएनजीसी (ONGC)

- हिन्दाल्को (HINDALCO)

- कोल इंडिया (COALINDIA)

- भारती एअरटेल (BHARTIARTL)

- युपीएल (UPL)

- झी एन्टरटेनमेंट लिमिटेड (ZEEL)

- बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

- पेट्रोनेट (PETRONET)

- एमआरएफ (MRF)

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT