LIC चे शेअर्स स्वस्त दरात हवे आहेत? 28 फेब्रुवारीपूर्वी करा हे काम

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा IPO मार्चमध्ये येत आहे.
LIC IPO
LIC IPOesakal
Summary

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा IPO मार्चमध्ये येत आहे.

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा IPO मार्चमध्ये येत आहे. LIC IPO चा काही भाग आपल्या पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवेल अशी अपेक्षा आहे. यामुळे पॉलिसीधारकांना शेअर्सचे वाटप होण्याची शक्यता वाढेल. कंपनी त्यांना किंमतीत सूट देऊ शकते. जर तुम्ही LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO चा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 28 फेब्रुवारीपूर्वी पॉलिसी पॅनशी लिंक करावी लागेल. 28 फेब्रुवारीपर्यंत लिंक न केल्यास तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाही.

LIC IPO
IPOच्या पार्श्वभूमीवर LIC मध्ये थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी

सर्वप्रथम तुमच्याकडे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर उघडा. आता हे काम ऑनलाइन केले जाते. दुसरे, तुमची विमा पॉलिसी पॅनशी (Permanent Account Number) लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासा. नसेल तर लगेच लिंक करा. एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना तसे करण्यास सांगितले होते.

LIC IPO
LIC चा सेबीकडे IPOसाठी अर्ज! मार्चपर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा

पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी एलआयसीने तीन स्टेप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक करणे सोपे जाईल.

1. www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करा

2. तुमच्या मोबाईल नंबरवर LIC कडून एक OTP येईल. हा OTP त्यात नमूद करा

3. फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज मिळेल जो तुमचा पॅन एलआयसी पॉलिसीशी जोडला गेला असल्याचे दाखवेल.

पॉलिसी पॅनशी कशी जोडाल ?

- सगळ्यात आधी तुम्हाला LIC च्या या लिंकवर क्लिक करावे लागेल.

linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus

- तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

- नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख dd/mm/yyyy फॉर्मेटमध्ये टाकावी लागेल.

- तुमचा पॅन नमूद करावा लागेल.

- त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तो एंटर करा.

- खाली दिलेल्या सबमिट ऑप्शनपर क्लिक करा.

यानंतर, पॉलिसी आणि पॅन लिंकिंगचे स्टेटस तुमच्या कंप्युटर किंवा लॅपटॉप स्क्रीनवर किंवा मोबाईल फोनवर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com