share market  sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये तेजी, आयटी, बॅंकींगच्या 'या' टॉप शेअर्समध्ये वाढ

आज शेअर बाजारात तब्बल 45 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर फक्त 5 शेअर्स खाली दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. गुरुवारीही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला मात्र आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सुरवातीच्या सत्रात तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स 360 अंकांच्या तेजीसह 59,130 वर उघडला तर निफ्टी 103 अंकाच्या तेजीसह 17,625 वर उघडला. (share market opening update 26 august 2022)

आज शेअर बाजारात तब्बल 45 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर फक्त 5 शेअर्स खाली दिसत आहे. MARUTI, BAJAJ-AUTO, ICICIBANK, RELIANCE, INDUSINDBK, TCS, AXISBANK, TATAMOTORS सारख्या मोठ्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसत आहे तरीसुद्धा शेवटचा दिवस असल्याने गुंतवणूकदारामंध्ये शेवटच्या सत्रापर्यंत धाकधूक कायम राहील.

गुरुवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 58775 वर आणि निफ्टी 83 अंकांनी घसरून 17522 वर बंद झाला होता. निफ्टी बँक 88 अंकांनी घसरून 38951 वर बंद झाला होता. त्याच वेळी, मिडकॅप 18 अंकांनी घसरला आणि 30943 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स घसरले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 31 शेअर्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 7 शेअर्स तेजीत होते.

अनिश्चित जागतिक परिस्थिती पाहता, गुंतवणूकदार त्यांच्या लाँग पोझिशन्समध्ये कपात करताना दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. याशिवाय, बेंचमार्क इंडेक्स गेल्या दोन व्यापार सत्रांमध्ये त्यांच्या नेगिटीव्ह क्षेत्राच्या अगदी जवळ गेले होते. अशा स्थितीत अपेक्षेप्रमाणे गुरुवारी घसरण दिसून आली होती.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

बजाज फायनान्स (BAJAJFIN)

सिप्ला (CIPLA)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

ऍक्सिस बँक (AXISBANK)

बालक्रिश्न इंडस्ट्रीज (BALKRISIND)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

एम फॅसिस (MPHASIS)

एल अँड टी (LTTS)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT