stock sakal
अर्थविश्व

Stocks | 'हे' 4 स्टॉक्स एका महिन्यात देतील चांगली कमाई!

शेअर बाजाराचा लॉन्ग टर्म आउटलुक चांगला असला तरी शॉर्ट टर्म आणखी पडझड होण्याची शक्यता आहे.

शिल्पा गुजर

शेअर बाजाराचा लॉन्ग टर्म आउटलुक चांगला असला तरी शॉर्ट टर्ममध्ये आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. अशावेळी गुंतवणूकदारांना स्टॉक स्पेसिफिक राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्याच वेळी, कोविड -19 च्या नवीन व्हेरीएंटने बाजारात अस्थिरता आहे. शेअर बाजाराचा लॉन्ग टर्म आउटलुक चांगला असला तरी शॉर्ट टर्म आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. अशावेळी गुंतवणूकदारांना स्टॉक स्पेसिफिक राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा काही शेअर्सची माहिती दिली आहे, जे शेअर्स 3 ते 4 आठवड्यांत वाढू शकतात. यामध्ये टाटा कम्युनिकेशन्स, एजिस लॉजिस्टिक्स, पिरामल एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलचा समावेश आहे.

1) टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications Limited)

सीएमपी (CMP) : 1292 रुपये

बाय रेंज: 1280-1256 रुपये

स्टॉप लॉस: 1200 रुपये

अपसाइड: 7टक्के -11टक्के

डेली चार्टवर 1200 रुपयांच्या आधीच्या ब्रेकआउट झोनमधून हा स्टॉक परत आला आहे, जे चांगले संकेत आहे. या स्टॉकने 200 दिवसांचा EMA (1244) परत मिळवला आहे जो सपोर्ट झोन आहे. डेली स्ट्रेंथ इंडिकेटर RSI आणि मोमेंटम इंडिकेटर दोन्ही तेजीत आहेत. या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्ममध्ये चांगला फायदा होऊ शकतो.

2) एजिस लॉजिस्टिक्स (Aegis Logistics Limited)

सीएमपी CMP: 228 रुपये

बाय रेंज: 224-220 रुपये

स्टॉप लॉस: 210 रुपये

अपसाइड: 8टक्के-13टक्के

डेली चार्टवर या शेअरच्या घसरणीनंतर मजबूत रिव्हर्स स्थिती दिसून येत आहे. डेली चार्टवर स्टॉक त्याच्या 20 आणि 50 दिवसांच्या SMA च्या वर चांगला आहे अर्थात त्यात तेजी आहे. डेली स्ट्रेंथ इंडिकेटर RSI आणि मोमेंटम इंडिकेटर दोन्ही तेजीच्या मोडमध्ये दिसत आहेत.

3) पिरॅमल एन्टरप्रायझेस (Piramal Enterprises Limited)

सीएमपी (CMP): 2483 रुपये

बाय रेंज: 2483-2530 रुपये

स्टॉप लॉस: 2640 रुपये

डाउनसाइड: 5टक्के-8टक्के

21 ऑगस्टपासून, हा शेअर 2900 ते 3000 च्या रेंजमध्ये राहिला आहे. शुक्रवारी, स्टॉक सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आणि त्याने क्लोजिंग बेसिसवर 2530 ची सपोर्ट झोन पातळी तोडली. शेअरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येतो आणि आणखी घसरण होऊ शकते.

4) जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel Limited)

सीएमपी (CMP): 631 रुपये

बाय रेंज: 640-652 रुपये

स्टॉप लॉस: 673 रुपये

डाउनसाइड: 5टक्के-9टक्के

एप्रिल 2021 नंतर, स्टॉकवर 700 ते 750 च्या आसपास सप्लायचा दबाव दिसत आहे. स्टॉकने 650 लेव्हलवर सपोर्ट झोन तोडले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT