Multibagger Stock : ‘या’ स्टॉकने 10 वर्षात 1 लाखाचे केले 10 कोटी!

मार्च ते मे दरम्यान गुंतवणूकदारांना मिळाला चांगला परतावा
Multibaggers
MultibaggersTeam eSakal

- शिल्पा गुजर

मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) : तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा कोणता स्टॉक आहे ज्याने 1 लाख रुपयांचे 1 कोटी रुपये बनवले आहेत. असे स्टॉक्स हेरण्यासाठी पारखी नजर आणि अनुभव महत्त्वाचा आणि त्याच्या जोडीला चांगले नशीब असणेही महत्त्वाचे आहे. आज आम्ही अशाच एका भन्नाट स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना 10 वर्षात गर्भश्रीमंत केलं. या शेअरचे नाव वैभव ग्लोबल (Vaibhav Global)आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर विश्वास आणि संयम ठेवला त्यांना बंपर परतावा मिळाला. वैभव ग्लोबल (Vaibhav Global) ही एक रत्ने आणि दागिन्यांची कंपनी आहे.

Multibaggers
आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींनी केलं सुतोवाच

10 वर्षांपूर्वी, 16 सप्टेंबर 2011 रोजी, एनएसईवर (NSE) वैभव ग्लोबलच्या (Vaibhav Global) शेअर्सची किंमत निव्वळ 7.13 रुपये होती. जी 17 सप्टेंबर 2021 रोजी 718 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच वैभव ग्लोबलच्या शेअर्सचा परतावा या 10 वर्षात 100 पट झाला आहे.

Multibaggers
दरमहा गुंतवा 1,500 रुपये, मिळतील 35 लाख; जाणून घ्या पोस्टाची भन्नाट स्कीम

गेल्या 6 महिन्यांत वैभव ग्लोबलच्या (Vaibhav Global) शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. मार्च 2021 पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलचे शेअर्स वाढत राहिले. या दरम्यान, कंपनीचे शेअर्स 996.70 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, यानंतर भरपूर प्रॉफिट बुकिंग झाले आणि ते खाली आले. प्रॉफिट बुकिंगनंतरही, वैभव ग्लोबलचे (Vaibhav Global) शेअर्स यावर्षी आतापर्यंत 510.42 रुपयांवरून 718 रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच, कंपनीच्या शेअर्सने 40 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षाचा कल पाहिल्यास वैभव ग्लोबलचे शेअर्स 375.77 रुपयांवरून 718 रुपयांवर गेले आहेत.

Multibaggers
अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात; संजय पुगालियांकडे जबाबदारी

म्हणजेच या स्टॉक्सने तब्बल 91 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षांत वैभव ग्लोबलचे शेअर्स 62.29 रुपयांवरून 718 रुपये झाले. म्हणजेच, या कालावधीत 1,050 टक्केचा मजबूत परतावा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जर कोणी 5 वर्षांपूर्वी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आज 11.50 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर 10 वर्षांपूर्वी कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्याकडे 1 कोटी रुपये असते. वैभव ग्लोबलच्या शेअर्सचा इतिहास पाहिला तर एखाद्या गुंतवणूकदाराने 31 डिसेंबर 2020 रोजी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 1.40 लाख रुपये झाली असती.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com