gold esakal
अर्थविश्व

लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी! व्याजही देणार सरकार

लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी! व्याजही देणार सरकार

सकाळ वृत्तसेवा

लग्नाच्या हंगामात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, या सोन्याच्या शुद्धतेपासून सुरक्षिततेपर्यंत चिंता कायम राहते.

लग्नाच्या हंगामात सोन्याची (Gold) खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. बहुतेक लोक फिजिकल गोल्ड खरेदी करण्याचा आग्रह धरतात. तथापि, या सोन्याच्या शुद्धतेपासून सुरक्षिततेपर्यंत चिंता कायम राहते. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या गोल्ड बॉंड योजनेंतर्गत (Gold bond scheme) तुम्ही सोने खरेदी केल्यास या चिंतांपासून मुक्त व्हाल. महत्त्वाची बाब म्हणजे, अशा सोने खरेदीवर सरकार व्याजही (Interest) देते. गोल्ड बॉंड योजनेंतर्गत सोन्याची किंमत किती आहे, ते जाणून घेऊया.

गोल्ड बॉंड योजनेंतर्गत सोन्याची किंमत

केंद्रीय रिझर्व्ह बॅंक गोल्ड बॉंड योजनेअंतर्गत सोन्याची किंमत निश्‍चित करते. या वेळी रिझर्व्ह बॅंकेने 4,791 रुपये प्रतिग्रॅम किंमत श्रेणी निश्‍चित केली आहे. त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रतिग्रॅम 50 रुपयांची सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी प्रतिग्रॅम सोन्याची किंमत 4,741 रुपये असेल.

जाणून घ्या गोल्ड बॉंड योजनेचा कालावधी

सुवर्ण रोखे योजनेंतर्गत सोन्यासाठी अर्ज 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी दिला जाऊ शकतो. ही योजना 3 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. म्हणजेच 3 डिसेंबरपर्यंत तुम्हाला गोल्ड बॉंड खरेदी करण्याची संधी आहे.

हे सोने फिजिकल स्वरूपात नव्हे तर बॉंडप्रमाणे खरेदी केले जाऊ शकते. याचा अर्थ, तुम्ही ते घालू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. यामध्ये शुद्धता किंवा सुरक्षिततेची चिंता नाही. ही योजना फक्त गुंतवणुकीसाठी आहे. यामध्ये तुम्ही 1 ग्रॅमपासून 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. त्याचबरोबर सरकार दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याजही देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT