बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल सक्रिय! पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची कबुली | Desh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल सक्रिय! पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची कबुली
बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल सक्रिय! पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची कबुली

'बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल पाकिस्तानात सक्रिय!'

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात धूळफेक करून पाकिस्तान (Pakistan) दहशतवाद्यांना सतत पाठिंबा देत आहे. दहशतवादाला (Terrorism) नष्ट करण्याऐवजी पाकिस्तान त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद (Shaikh Rashid Ahemed) यांनीच आता देशात बंदी घातलेल्या संघटनांचे स्लीपर सेल (Sleeper Cell) सक्रिय असल्याची कबुली दिली आहे. डॉनच्या वृत्तानुसार, गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, देशात 78 संघटनांवर बंदी आहे. काही बंदी असलेल्या संघटनांचे स्लीपिंग विंग कारवाया करत आहेत. हे स्लीपर सेल तोडफोडीची एकही संधी सोडत नाहीत.

हेही वाचा: मौलवीशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चार तरुण ईशनिंदा कायद्याला बळी

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या डोळ्यात धूळफेक करून पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत पाठिंबा देत आहे. दहशतवादाला नष्ट करण्याऐवजी पाकिस्तान त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. अलीकडेच एका पाकिस्तानी न्यायालयाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह सहा दहशतवाद्यांची सुटका केली आहे.

हेही वाचा: 'सोशल'वर ओळख झालेल्या मुलीला घरी बोलावले, गुंगीचे औषध दिले अन्‌...

संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी संघटनेने तपासाची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी गट तपासापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या संघटनांची नावे बदलत असल्याचेही वृत्त आहे. एप्रिल 2021 मध्ये, न्यूयॉर्क स्थित आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्ट-अप कॅस्टेलमने उघड केले की, पाकिस्तानने त्याच्या दहशतवादी वॉच लिस्टमधून सुमारे 4,000 दहशतवाद्यांची नावे गुपचूप काढून टाकली आहेत. हटवण्यात आलेल्या नावांमध्ये लष्करचा नेता आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीर उर रहमान लखवी आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

loading image
go to top