work from home sakal
अर्थविश्व

Work From Home : पुन्हा वर्क फ्रॉम होम! वाढत्या कोरोनामुळे कंपन्यानी सुरू केला पुनर्विचार

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या BF.7 व्हेरिएंटमुळे नवीन लाटेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये याबबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय कंपन्या देखील कोविड-19 च्या नव्या संसर्गामुळे सावध आहेत.

दरम्यान, अनेक कंपन्या पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' (WFH) म्हणजेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे परिस्थिती आणखी बिघडली तर पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड-19 चाचणी अनिवार्य केली आहे.

मिंटने दिलेल्या माहितीनुसार, "ऑटोमोबाईल, व्यावसायिक कार्यालय, हॉस्पिटेलिटी, प्रवास आणि वाहतूक क्षेत्र हाय अलर्टवर असतील," असे करियरनेटचे सीईओ अंशुमन दास यांनी सांगितले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

कोरोना BF.7 च्या नवीन प्रकारामुळे चीनमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. त्याच वेळी, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत प्रकरणे वाढत आहेत. एका उद्योग अधिकाऱ्याने सांगितले की, कोविडची बातमी अशा वेळी येत आहे जेव्हा जागतिक मंदीच्या भीतीमुळे कंपन्या आधीच नवीन भरती करत नाहीत.

त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमुळे पर्यटन आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्राची चिंता वाढली आहे. उत्पादन आणि ग्राहक सेवांसारख्या इतर क्षेत्रातील कंपन्यांनी नोकरभरती थांबवली नाही.

जागतिक मंदीच्या भीतीसह अनेक देशांमध्ये कोविड-19 ची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन कंपन्यांनी नोकरभरतीच्या योजनांबाबत सावधगिरी बाळगत आहे. पर्यटन, वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्याही भारतात चौथी लाट आल्यास घरातून कामाच्या पर्यायांचा विचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT