Blog | ब्लॉग

बैल आभाळाची कृपा

विवेक मेतकर

अकोला : बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप। काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।।
बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक। बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।।
ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा 'वृषभसूक्त' नावाचा कवितासंग्रह... विलक्षण अशा 'भूदेव' शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला सण म्हणजे 'पोळा'.

नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून मोठया प्रमाणात धान्याचे उत्पादन व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खऱ्या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला, संगीत व इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. पोटाची भूक मिटवल्यामुळे मेंदूची वाढ सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.

संस्कृतीला कलाटणी

शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला. मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरवात झाली, असे मानण्यात येते. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला, या नांगराला ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आले आणि मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणी मिळाली.

यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक

पाच हजार वर्षांपूर्वीच्या ॠग्वेदात 'कृषी सूक्त' उल्लेखानुसार बैल-नांगर-माणूस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. ॠग्वेदात गायीचे जे गोडवे गायले जातात, त्याला इतर कारणांबरोबरच ती शेतीसाठी बैल देते म्हणूनही शेती करणाऱ्या समाजाला तिचे कौतुक राहिलेले आहे.

साहित्यातील वृषभ

माझ्या वासराने हुंगुनिया माती, जुवाच्या जोत्याला भिडविली छाती माझ्या वासराने हुंगले आभाळ, आणि धरणीही कापे चळचळ 'दूर राहिला गाव' इंद्रजीत भालेराव यांच्या कवितासंग्रहात वासराचा बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पध्दतीने आली आहे. गायीच्या पोटी आलेले वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो. त्याला मोठे करतो. हे घरचे वासरू शेतात काम करण्याजोगते झाले की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्यासोबत हा मोठा झालेला शेतकरीही राबतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची साथ मिळाली, तर घरात लक्ष्मी येते, अशी सगळ्या शेतकरी समाजाची श्रध्दा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT