Datta Jayanti 2022 Esakal
संस्कृती

Datta Jayanti 2022: श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे संदेश...

त्रिमुखी म्हणजेच 3 चेहरे आणि 6 भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे, असे म्हणतात.

सकाळ डिजिटल टीम

Lord Dattatreya: श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती  7 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगात श्री दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच 3 चेहरे आणि 6 भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे, असे म्हणतात.

शीघ्र कृपा करणारे, भक्त वत्सल असलेले श्री दत्तात्रेय भगवान यांना स्मृतिगामी तसेच सृतिमात्रानुगत्ता असे देखील संबोधले जाते. दक्षिण भारतात दत्त संप्रदाय हा श्री दत्तात्रेय भगवान यांनाचा प्रमुख आराध्य मानतात. ऋषी अत्री आणि अनुसया याच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला होता. मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात श्री दत्तात्रेय भगवान यांची पूजा केली जाते. 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 02 मिनिटांला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. तर 8 डिसेंबरला सकाळी 9 वाजून 38 मिनिटांला पौर्णिमा समाप्त होणार आहे. 

1) दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी, आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो आणि आपल्या आयुष्यात काय सुखसमृद्धी येवो दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2) आत्मसुखाचा मोक्ष लुटाया, अमोल ठेवा हाती धरा, दत्तचरण माहेर सुखाचे, दत्तभजन भोजन मोक्षाचे, गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट, दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!धावत येसी भक्तांसाठी,ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4) ज्याच्या मनी गुरु विचार,तो नसे कधी लाचारज्याच्या अंगी गुरु भक्ती,त्याला नाही कशाची भीतीज्याच्या हृदयात गुरु मुर्ती,त्याची होई जगभरात किर्तीजो करेल गुरु ची पूजा,त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा, श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

5) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!श्री दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

6) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!धावत येसी भक्तांसाठी,ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7) ज्याच्या मनी गुरु विचार, तो नसे कधी लाचारज्याच्या अंगी गुरु भक्ती, त्याला नाही कशाची भीतीज्याच्या हृदयात गुरु मुर्ती, त्याची होई जगभरात किर्तीजो करेल गुरु ची पूजा, त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा, श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

8) चरण शुभंकर फिरता तुमचे,मंदिर बनले उभ्या घराचे,घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले,मला ते दत्तगुरु दिसले,श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

9) दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!!

10) ॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

11) शिकवितो जो जगण्याचा सारतोच तू आमुचा एकमेव आधारतू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

12) दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा!

13) दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची सायसायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्ताची गायदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

14) दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!

15) गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:गुरुर साक्षात परम ब्रह्म,तस्मै श्री गुरुवे नम:श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT