Ganesh Utsav
Ganesh Utsav sakal
संस्कृती

Ganesh Chaturthi: या गणेश चतुर्थीला आहे शुभ योग; जाणून घ्या गणपतीची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2022 Date: भाद्रपद महिना भगवान श्रीकृष्ण आणि श्री गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. भगवान श्रीकृष्ण आणि श्री गणेश या दोघांचाही जन्मदिवस याच महिन्यात आहे.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला असंख्य ठिकाणी मनोभावे गणपतीची स्थापना केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे. या वर्षीची गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट म्हणजे बुधवारी आहे. गणेश चतुर्थी ही बुधवारी असल्याने गणेश चतुर्थीचे महत्त्व असंख्य पटींनी वाढले आहे. कारण बुधवार हा दिवस गणपतीला समर्पित असून या दिवशी गणेश चतुर्थी आल्याने या चांगला योग जुळून आला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीची स्थापना करून गणपतीला मोठ्या आनंदाने 10 दिवस घरात मनोभावे पुजन केले जाते.

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत:

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट, मंगळवारी दुपारी 3:33 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:22 वाजता समाप्त होईल.

उदय तिथीनिमित्त गणेश चतुर्थी व्रत 31 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 11:05 ते 1:38 पर्यंत आहे. त्याचवेळी 09 सप्टेंबर 2022 रोजी गणेश विसर्जन होणार आहे

आता बघू या गणपती बाप्पा घरात नेमका कसा बसवायचा?

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या आनंदाने घराघरात गणपती विराजमान केला जातो. त्यांची 10 दिवस घरात ठेवून मनोभावे पूजा केली जाते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. यानंतर पाटावर लाल कापड टाकून गणेशमूर्तीची स्थापना केली करावी. बाप्पाला पंच अमृताने अभिषेक करावा. नंतर गणपती बाप्पालख गुलाल, अक्षदा, दुर्वा, फुले अर्पण करावी. पुढे मग गणपती बाप्पा आवडता नैवेद्य म्हणजे 21 मोदक गणपतीला अर्पण करावे .

शेवटी आरती आणि मंत्र जप केला करावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात बाप्पाची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा केल्याने बाप्पा भक्तांचे सर्व अडथळे दूर करतात, अशी श्रद्धा आहे. त्यांचे संकट दूर करा आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT