Kamika Ekadashi esakal
संस्कृती

Kamika Ekadashi : कामिका एकादशीला या मंत्रांचा जप केल्याने होतो लाभ

चातुर्मासात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्व आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Kamika Ekadashi Mantra Jaap And Puja Vidhi : एकादशी दर पंधरा दिवसांनी येत असते आणि त्याचे विशेष महत्वही असते. एकादशीला विष्णू पूजेला महत्व असते. शिवाय चातुर्मासातही विष्णूपूजेला विशेष महत्व असते. त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्व आहे.

कामिका एकादशीचे व्रत केल्याने साधकाला शुभ फळ प्राप्त होते. जाणून घेऊया या व्रताचे महत्व, पूजाविधी आणि कोणते जप करावे.

आज १३ जुलै २०२३ रोजी कामिका एकादशी आहे. चातुर्मासात भगवान विष्णू ४ महिने योग निद्रेत असतात असे मानले जाते. अशात कामिका एकादशीली विधीवत पूजा जप करून विष्णूकृपा प्राप्त करता येते. असे मानले जाते की, जे लोक ही एकादशी मनापासून करतात त्यांना वाइट कर्मफळांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती हेते.

कामिका एकादशी व्रत महत्व

कामिका एकादशी चातुर्मासात येत असल्याने याचे विशेष महत्व आहे. या व्रतामुळे जाणत्या, अजाणत्यापणे झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. कामिका एकादशीच्या व्रताचे अश्वमेध यज्ञांप्रमाणे फळ मिळते. या दिवशी भगवान विष्णूंना तुळस अर्पण केल्याने पितृदोष मुक्त होता. इच्छापूर्ती होते.

व्रत पूजाविधी

सकाळी स्नान झाल्यावर देवघरात गंगाजल शिंपडून पवित्र करावे. त्यानंतर चौरंगावर पिवळा कापड टाकून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. पंचामृत, फळ, मेवा, मिठाई अर्पण करावे. त्यानंतक मनोभावे पूजा करावी. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पूजेत तुळस नक्की अर्पण करावी.

आज या मंत्रांचा करावा जप

  • ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

  • ओम नमो नारायणाय नमः

  • श्रीमन नारायण नारायण हरीहरी

  • श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT