Nag Panchmi 2024 esakal
संस्कृती

Nag Panchmi 2024 : यंदा नागपंचमी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् पुजेची पद्धत

Nag Panchmi 2024 : दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Nag Panchmi 2024 : श्रावणा महिना नुकताच सुरू झाला आहे. या श्रावण महिन्यात उत्साहाने साजरा केला जाणारा पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी होय. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. तसेच, नागपंचमीला महिला झिम्मा-फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपारिक खेळ खेळतात. गावाकडे आज ही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.

दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने, जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते, असे मानले जाते.

तसेच, नागपंचमीच्या दिवशी महादेवांची अन् नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी? नागपंचमीचा शुभ मुहूर्त अन् पूजा पद्धत काय? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

नागपंचमीचा शुभ मुहूर्त

यंदा नागपंचमीचा सण ९ ऑगस्टला (शुक्रवारी) सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ९ ऑगस्टला सकाळी १२ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी १० ऑगस्टला पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल.

या परिस्थितीमध्ये उदयतिथीनुसार नागपंचमीचा सण ९ ऑगस्टलाच सर्वत्र साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा ९ ऑगस्टला पहाटे ५ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी १ वाजतेपर्यंत हा मुहूर्त राहील. या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता.

नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत

  • नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी-देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरूवात करा.

  • त्यानंतर, अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा.

  • आता सूर्यदेवतेला जल अर्पण करा.

  • त्यानंतर, शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र (जिवती) किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा.

  • आता नागदेवतेला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात.

  • पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी.

  • त्यानंतर, तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT