Nag Panchami Special Recipe : नागपंचमी स्पेशल पारंपारिक पुरणाचे दिंड कसे तयार करायचे?

श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी.
Nag Panchami Special Recipe
Nag Panchami Special Recipe Esakal

Nag Panchami Special Recipe : श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी. या दिवशी महाराष्ट्रात स्वयंपाकघरात चिरणं, कापणं निषिद्ध असतं त्यामुळे नागपंचमी विशेष जेवण विशेष असतं. नाग देवतेची पूजा करून नैवेद्य दाखवताना आणि उपवासानिमित्त विशेष पदार्थ देखील बनवले जातात. चला तर मग पाहू या नागपंचमी दिंड कशी बनवतात याची सविस्तर रेसिपी...

साहित्य: 

एक कप गव्हाचे पीठ

मीठ

तेल

चण्याची डाळ (दोन वाट्या)

गूळ (दोन वाट्या)

वेलची पावडर

जायफळची पावडर

केशर

तूप

Nag Panchami Special Recipe
Nag panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी जरूर करा या सातपैकी एक उपाय, होतील फायदे

कृती:

सुरूवातीला पूरण तयार करण्यासाठी दोन वाट्या चण्याची डाळ घ्यायची आहे. ही डाळ कुकूरमध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे. डाळ झिजल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने त्यामधील पाणी गाळून डाळ वेगळी करा. या पाण्याची तुम्ही आमची किंवा कट करु शकता. डाळ आपल्याला पूरणासारखी वाटायची नाही. तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने डाळ दाबून दाबून क्रश करुन घ्याचची आहे. आता गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये क्रश केलेली डाळ टाका. जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ टाकून हे मिश्रण एकजीव करा. गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर डाळ हलवत राहा. या मिश्रणात थोडेसे मीठ, वेलची पूड आणि जायफळ पावडर टाका. तसंच केशर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. पूरण पातळसर असतानाच गॅस बंद करा. कारण थंड झाल्यानंतर हे पूरण घट्ट होते. आता यामध्ये थोडेसे तूप टाका.

Nag Panchami Special Recipe
Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी चिरणे, तळणे, भाजणे या गोष्टी टाळण्यामागे मूळ कारण काय आहे? 

पूरणाचे दिंड तयार करण्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे. त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे. पूरीसाठी ज्या पद्धतीने कणीक मळतो तसे थोडे थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यायचे आहे. कणीक घट्टसर मळून घ्या. आता हे कणीक थोड्या वेळ झाकून ठेवा. त्यानंतर आता तुम्ही पूरीसाठी ज्या पद्धतीने पीठाचे गोळे करता तसे गोळे तयार करुन त्याची लांबसर पोळी लाटून घ्या. त्यावर आता पूरण चमच्याच्या सहाय्याने ठेवा. आता आयताकृती आकारामध्ये म्हणजेच पोळीच्या चारही बाजू एकमेकांवर चिकटवा. अशापद्धतीने दिंड तयार होतील. आता हे दिंड वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी ठेवून आपण ज्या पद्धतीने आळूच्या वड्या वाफवून घेतो त्या पद्धतीनेच केळीच्या पानावर हे दिंड ठेवून 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. थोड्या वेळाने थंड झाल्यावर या दिंडावर तूप घालून ते खावू शकता. हे दिंड खायला खूपच चविष्ट लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com