Shani Amavasya 2023 Esakal
संस्कृती

Shani Amavasya 2023 : शनिश्चरी अमावस्येला 'करा' हे उपाय; घरात कधीच भासणार नाही पैशांची चणचण

पौष अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन्ही दिवस स्नान आणि दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

सकाळ डिजिटल टीम

आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्याला शनिश्चर अमावस्या म्हटली जाते. या वेळी दुहेरी योग आहे. ही अमावस्या खूप खास आहे. कारण 20 वर्षांनंतर शुभ योग आला आहे. माघी अमावस्या म्हणजे मौनी अमावस्यादेखील आहे.  पौष अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन्ही दिवस स्नान आणि दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अलीकडेच शनीचे संक्रमण झाले आहे. शनीने त्याच्या मूळ त्रिकोण चिन्ह कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या कारणास्तव ही शनिश्चरी अमावस्या शनीची कृपा मिळवण्यासाठी आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप खास असेल.आजच्या लेखात जाणून घेऊया शनिश्चरी अमावस्येला शनीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे याविषयीची सविस्तर माहिती.

1) मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, तर्पण आणि पूजा करावी. गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान करण्याइतके पुण्य मिळेल मौनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करणे फार महत्वाचे आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान करण्याइतके पुण्य मिळते.

2) विशेषत: ज्यांची शनीची महादशा आहे त्यांनी या दिवशी गंगा स्नानासह काही विशेष उपाय अवश्य करावेत. असे केल्याने शनिदेवाची अपार कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात. 

3) शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी स्नान करून दान करावे. असे केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. याउलट जे पितृदोषाचे बळी आहेत, त्यांनी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितरांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, प्रगती आणि समृद्धी येते. 

4) जर तुम्हाला पवित्र नदीच्या काठी जाऊन तर्पण करता येत नसेल तर घरीच तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या पोळीने हवन करावे.

5) शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. याशिवाय प्रगतीत येणारे अडथळेही दूर करतात.

आता बघू शनिश्चरी अमावस्या पूजेचा मुहूर्त कोणता आहे?

माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी शनिवार, 21 जानेवारी रोजी सकाळी 06:17 पासून सुरू होईल आणि रविवार, 22 जानेवारी रोजी पहाटे 02:22 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार मौनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या 21 जानेवारीला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT