
Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला हेल्दी ठेवणारा स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स कसा तयार करायचा?
stir fried vegetables : स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स हा प्रकार मूळचा चायनीज पदार्थ आहे. स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स या प्रकारात तुम्ही अनेक भाज्या वापरू शकता. भरपूर भाज्या पोटात जाण्यासाठी हा चविष्ट तरी डायट फ्रेंडली उपाय चांगला आहे.आजच्या लेखात आपण स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स कसे तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत
साहित्य :
1) ब्रोकोली एक गड्डा
2) बेबी कॉर्न पाच सहा
3) एक कांदा
4) एक चमचा तीळ
5) सात ते आठ लसूण पाकळ्या चिरून
6) हिरव्या मिरच्या चिरून
7) रिफाईंड शेंगदाणा तेल
8) तिखट एक चमचा
9) मीठ चवीनुसार
10) सोया सॉस एक चमचा
हेही वाचा: Winter Recipe: खान्देशातील पारंपरिक पदार्थ असलेले पौष्टिक लांडगे कसे तयार करायचे?
कृती :
ब्रोकलीचे तुरे नीट कापून घेऊन थोडे मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावेत. बेबी कॉर्न धुवून गोल काप करुन घ्यावेत. लसूण आणि मिरची मध्यम चिरून घ्यावेत.कांदा उभ्या पाकळ्यांमधे चिरून घ्यावा. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तीळ घालावेत. कांदा घालावा. मीठ घालून परतायचे. आच मोठी असावी. कांदा लालसर झाला की लसूण, मिरची घालावी. मग ब्रोकोली आणि बेबी कॉर्न घालायचं. वेगात परतायचं. वरून चमचाभर सोया सॉस आणि तिखट घालायचं. गरमागरम स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स तयार आहेत. स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स सोबत जर का गरम भात, फ्राईड राईस, नूडल्स किंवा एखादं सँडविच आणि एखादं सूप असेल तर मस्त पोटभरीचं, चविष्ट आणि पौष्टिक जेवण होणार.