Ukadiche Modak Recipe Esakal
संस्कृती

Ukadiche Modak Recipe: उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी

गणपतीसाठी बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात.

दिपाली सुसर

Ganpati Bappa: यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर हा गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गणपतीसाठी बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. चला तर मग आज बघू या..उकडीचे मोदक तयार करण्याची परफेक्ट रेसिपी नेमकी कशी आहे?

सुरूवातीला बघू या उकडीचे मोदक तयार करण्यासाठी लागणारी उकड कशी तयार करायची?

साहित्य:

● अर्धा कप पाणी

● अर्धा कप दूध

● तूप

● मीठ

● एक वाटी तांदळाचे पिठ

अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध एका कढईमध्ये टाकून त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडसं तूप टाका. त्यानंतर एक वाटी तांदळाचे पीठ टाका. गॅसचा फ्लेम लो करुन व्यवस्थित पीठ हालवून घ्या. गॅसचा फ्लेम लो करुन पाच मिनिटं कढईवर झाकण ठेवा. त्यानंतर गॅस बंद करुन 15 मिनिटं पीठ तसंच झाकून ठेवा. त्यानंतर ही उकड एका ताटामध्ये घ्या. पाण्याचा वापर न करता उकड व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करुन घ्या. या पीठाचे छोटे गोळे तयार करुन घ्या. एक कप वाटी तांदळाच्या पीठामध्ये सात ते आठ मोदक तयार होतात.

आता बघू या उकडीच्या मोदकासाठी सारण कसे तयार करायचे?

साहित्य:

● तूप

● सुका मेवा

● खसखस

● नारळाचा चव

● दुध

● गुळ

● वेलची पूड आणि जायफळची पूड

कढईमध्ये एक चमचा तूप घ्या. त्यामध्ये सुका मेवा तुम्हाला आवडतो तो घ्या. बदाम, काजूचे बारीक तुकडे करुन तुपामध्ये टाका. त्यानंतर त्यामध्ये खसखस टाका. बदाम, काजू आणि खसखस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप नारळाचा चव टाका आणि दोन मिनिटं व्यवस्थित भाजून घ्या. (जर तुमच्याकडे नारळाचा चव नसेल तर तुम्ही एक कप डेसिकेटेड कोकनट घ्या. त्यामध्ये तीन ते चार चमचे दूध टाकावे लागेल.) त्यानंतर यामध्ये एक कप गूळ घाला. गूळ टाकल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित पाच मिनिटं शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड टाका. यामुळे सारणाला खूपच चांगली चव येईल.

आता बघू या मोदक कसे तयार करायचे?

या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नऊ अशा पाडाव्यात. काही जणी आपल्या आवडीनुसार आधी कळ्यापाडून नंतर सारण भरतात. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT