
जगभरात भारतीय मोठ्या संख्येने आहेत. आणि ते आपापल्या ठिकाणी गणेशोत्सवात गणेश स्थापना करतात. पण यासाठी ते भारतीय कॅलेंडर वापरतात आणि इकडच्या कॅलेंडरनुसार तिकडच्या दिवसांना सण साजरे करतात. पण प्रत्येक ठिकाणचा सुर्योदयाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने तिथी बदलतात. त्यामुळे भारतीय कॅलेंडरनुसार सण साजरे न करता तिकडच्या सुर्योदयानुसार करावे. श्रध्देबरोबर काळालाही शास्त्रात महत्व आहे.
कुठे कधी आहे गणेश स्थापना
अमेरिकेचे अक्षांश, रेखांश आणि सुर्योदय, सुर्यास्त लक्षात घेऊन तेथील गणेश स्थापना मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी अंगारकी योगावर आले आहे. हा सर्वात चांगला योग समजला जातो.
मुहूर्त
अमेरिकेत हा प्राणप्रतिष्ठा मुहूर्त स्थानिक सुर्योदयापासून ते मध्यांनापर्यंत साधारण दूपारी २ वाजेपर्यंत आहे. याचे भारतीय वेळेशी संबंध नाही.
यूरोप खंडात
लंडन, रोम आदी युरोप खंडातील सर्वच शहरात गणेश स्थापना ही मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी अंगारकी योगावर आले आहे. हा सर्वात चांगला योग समजला जातो.
मुहूर्त
प्राणप्रतिष्ठा मुहूर्त स्थानिक सुर्योदयापासून ते मध्यांनापर्यंत साधारण तिथल्या दूपारी पावणे दोन वाजेपर्यंत करणे शास्त्र संमत ठरणार आहे.
मध्य आशिया देश (अरब देश)
या देशांमध्येसुध्दा अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. त्यामुळे त्यांनीही ३० ऑगस्ट २०२२ रोजी गणेश स्थापना करणे योग्य ठरणार आहे.
मुहूर्त
इथे देखिल स्थानिक सुर्योदयाच्या वेळेपासून ते मध्यांन दुपारी दीड वाजेपर्यंत गणेश मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा करू शकतात.
सिंगापूर ते जपानपर्यंत
या भारताच्या पूर्वेकडच्या देशांमध्ये सिंगापूर ते जपानपर्यंत बुधवार ३१ ऑगस्टचा मुहूर्त आहे. त्या भागामध्ये बुधवारी गणेश स्थापना करणे योग्य ठरणार आहे. आशिया सोडून ऑस्ट्रेलियापर्यंत गेलात तरी बुधवारचा योग आहे याची नोंद घ्यायला हवी.
मुहूर्त
या देशांमध्ये सुर्योदयापासून तेथील मध्यांन म्हणजे दुपारी १ वाजेपर्यंत योग आहे. या काळात कधीही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकतात.