delhi Crime News  esakal
देश

चक्क सिगारेटसाठी 10 रुपये न दिल्याने तरुणाला भोसकले, आरोपींवर गुन्हा दाखल

आनंद पर्वत परिसरात ही हत्या झाली असून यामुळे परिसरात घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आनंद पर्वत परिसरात ही हत्या झाली असून यामुळे परिसरात घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत गुन्हेविषयक एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केवळ १० रुपयाच्या सिगारेटसाठी तरुणांच्या टोळक्याने एका व्यक्तीचा भोसकून निघृण खून केल्याची माहिती मिळत आहे. येथील आनंद पर्वत परिसरात ही हत्या झाली असून यामुळे परिसरात घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (delhi Crime News)

मिळालेली माहिती अशी की, दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात तरुणांच्या टोळक्याने एका अज्ञान व्यक्तीचा खून केला आहे. फक्त १० च्या सिगारेटसाठी त्यांनी हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव विजय असे आहे. तर त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची आरोपींची नावेही समोर आली आहे. याप्रकरणी रवी, जतीन, सोनू कुमार आणि अजय यांच्यावर 6 जून रोजी पोलिसांनी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांनी त्यांच्या सोर्सच्या मदतीने रवी, जतीन, सोनू कुमार आणि अजय या चारही आरोपींना अटक केली आहे. 5 जून रोजी चार आरोपी आनंद पर्वत येथून परत येत असताना त्यांचा एचआर रोडवर मृत व्यक्तीसोबत सिगारेटच्या कारणावरून वाद झाला असल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी दिली आहे.

यावेळी तेथेच बसलेल्या विजयकडे आरोपींनी सिगारेटसाठी 10 रुपये देण्याची मागणी केली. मात्र विजयने त्याला नकार दिला. यानंतर आरोपी आणि विजय यांच्यात हाणामारी झाली. हा वाद इतका टोकाल गेला की, यानंतर सोनू आणि त्याच्या साथीदारांनी मृत विजयवर चाकूने वार करण्यास सुरवात केली ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT