Gruha Lakshmi Scheme Belgaum esakal
देश

Sarkari Yojana : आता महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2 हजार; 'गृहलक्ष्मी'चा 14.71 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

सरकारने योजना लागू करण्यासाठी किमान अटी घातल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मासिक दोन हजार रुपयांप्रमाणे दरमहा जिल्ह्याला २९४ कोटी १४ लाख ८४ हजार रुपये मंजूर केले जाणार आहेत.

बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा (Gruha Lakshmi Scheme) शासनाने अधिकृतपणे प्रारंभ केला असून, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १४.७१ लाख कुटुंबांना मिळणार आहे.

दरमहा जिल्ह्याला २९४ कोटी १४ लाख ८४ हजार रुपये मंजूर केले जाणार आहेत. दर महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला (Women) आतुरतेने वाट पाहत आहेत.

सरकारने योजना लागू करण्यासाठी किमान अटी घातल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यातील एकूण १४, ७०, ७४२ शिधापत्रिकाधारक असून, यापैकी ६८, ६४२ अंत्योदय कुटुंबे, १०,८०,८९० बीपीएल कुटुंबे आणि ३,२१,२१० दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे आहेत.

मासिक दोन हजार रुपयांप्रमाणे दरमहा जिल्ह्याला २९४ कोटी १४ लाख ८४ हजार रुपये मंजूर केले जाणार आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांचीही यासाठी मदत घेतली जात असून, ग्रामीण भागातील महिलांना अर्ज भरण्यासाठी त्या मदत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT