Chandoli Dam : पावसाचा जोर वाढल्यास धरणातून केंव्हा ही पाणी सोडण्यात येणार; वारणाकाठी सावधानतेचा इशारा

चांदोली धरण (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.
Chandoli Dam Warna River
Chandoli Dam Warna Riveresakal
Summary

धरण व वारणा नदीच्या (Warna River) पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वारणा काठाची पिके पाण्याखाली गेली आहेत.

शिराळा : चांदोली धरण (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून चांदोलीत अतिवृष्टी झाली आहे. धरणात २२१०४ क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. २४ तासांत चांदोलीत ७६ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरण व वारणा नदीच्या (Warna River) पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वारणा काठाची पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर वाढल्यास धरणाच्या जलाशय परिचालन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून केंव्हा ही पाणी सोडण्यात येईल.

Chandoli Dam Warna River
Chiplun Flood : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; 36 वाड्यांना स्थलांतराच्या नोटिसा, 18 पथकं तैनात

त्यामुळे वारणाकाठी सावधानतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे. सोमवारी पावसाचा जोर कालच्या पेक्षा कमी आहे. असला तरी अधून मधून पावसाची संततधार सुरु आहे. सायंकाळी चार वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६१७ .६० मीटर आहे. पाणीसाठा ७३९ .०७१ दलघमी असून २६.१ ० टी.एम.सी म्हणजे ७५ .८६ टक्के पाणीसाठा आहे.

Chandoli Dam Warna River
मोठी बातमी! सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार? 'या' राज्यातील मुख्यमंत्र्याची विनंती करणार मान्य

रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या २४ तासात ७ ६ मी.मी तर सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आठ तासात २२ मी .मी .अशा एकूण ८९४ मी. मी.पावसाची नोंद झाली आहे.कोकरूड ते रेठरे, मांगले -सावर्डे, शिराळे खुर्द- माणगाव हे बंधारे तर पाण्याखाली गेलेले आहेत.

मध्यम प्रकल्प व लपा तलाव पाणीसाठा टक्केवारी

  • मोरणा धरण - ५०

  • ल.पा.तलाव वाकुर्डे - १००

  • ल.पा.तलाव अंत्री बुद्रुक- ६७

  • ल.पा.तलाव शिवणी - ३७

  • ल.पा.तलाव टाकवे - २५

Chandoli Dam Warna River
DK Shivakumar : कर्नाटकातलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सिंगापुरात मोठं षड्‍यंत्र; उपमुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

मंडलनिहाय मी . मी. मध्ये पडलेला पाऊस

  • कोकरूड - ५३.८

  • शिराळा - ३४.५

  • शिरशी - २८.५

  • मांगले - २७.३

  • सागाव - ३३

  • चरण - ४७

Chandoli Dam Warna River
डॉ. आंबेडकर कमान वाद : सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बजावलेली नोटीस नियमानुसारच; सात दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश

पर्जन्यमापक यंत्रावर धरण क्षेत्रातील नोंद

  • पाथरपुंज १५४ मिलिमीटर (१९१५)

  • निवळे ९७ मिलिमीटर (२०५१)

  • धनगरवाडा १०० मिलिमीटर (११७८)

  • चांदोली ७६ मिलिमीटर ( ८७२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com