देश

पंजाब | आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 मुलांसह सात सदस्यांचा मृत्यू

घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील होते.

सकाळ डिजिटल टीम

लुधियाना : मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास झोपडीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुलांचा समावेश आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब बिहारमधील (Bihar) समस्तीपूप जिल्ह्यातील बोगापूर गावातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बलदेव राज यांनी सांगितले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Seven Member Of Family Burnt Alive In Fire )

सुरेश (54), रौर देवी (50), राखी (15), मनीषा (10), चंदा (8), गीता (6) आणि मुलगा सनी (2) अशी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मृत बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील बोगोपूर गावातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बलदेव राज यांनी सांगितले की, घटनेत मृत्युमुखी पडलेले कुटुंब स्थलांतरित मजूर असून, ते येथील टिब्बा रोडवरील महापालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ एका छोट्याशा झोपडीत राहत होते. दरम्यान, मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री दोनच्या सुमारास हे कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक आग लागली. त्यात या सर्वांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. झोपडीमध्ये चिंध्या, प्लास्टिक इतर साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि त्यातच या कुटुंबातील पाच मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT