Corona  सकाळ
देश

''महाराष्ट्रात कोविडमुळे डॉक्टर, नर्ससह 86 कोरोना योद्ध्यांचा मृत्यू''

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोविडमुळे आतापर्यंत 67 डॉक्टर, 19 परिचारिकांचा मृत्यू झाला असून, गुजरातमध्ये 20 डॉक्टर, 20 परिचारिकांचा , 6 रुग्णवाहिका चालक आणि 128 पॅरामेडिक्सना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे लेखी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या 15 ते 18 वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाबाबत माहिती दिली. ( Total Doctors & Nurses Death Due to Covid 19 in Maharashtra)

ते म्हणाले की, 15 ते 18 वयोगटातील पाच कोटींपेक्षा अधिक तरुणांनी आतापर्यंत कोरोना लसीचा (COVID19 vaccine) पहिला डोस देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Mansukh Mandaviya) देशात कोरोना विषाणूविरोधातला लढा सध्या सुरु असून, लसीकरणाच्या सुरुवातील फ्रंट लाईन वर्कर्स, त्यानंतर वयस्कर आणि नंतर 18 वर्षे वयावरील लोकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे.

स्पुटनिक लाईटला मान्यता

दुसरीकडे, भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DCGI) भारतात सिंगल-डोस स्पुटनिक लाईट (Corona Vaccination) कोविड-१९ लसीला (Sputnik Light Vaccine) आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे. याबाबतची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे काल दिली होती. ही देशातील 9वी कोरोना लस असल्याचे त्यांनी ट्विट केलंय. यामुळे साथीच्या रोगाविरुद्ध देशाचा एकत्रित लढा आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT