Amit Shah: sakal
देश

Amit Shah: अमली पदार्थ तस्करीत काँग्रेसशी संबंधित व्यक्ती; गृहमंत्री अमित शहांकडून टीकास्त्र!

Latest BJp news: अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी कॉंग्रेसशी संबंधित तुषार गोयल नावाच्या आरोपीस अलीकडेच दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Latest New Delhi News: अमली पदार्थांच्या तस्करीत कॉंग्रेसशी संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

एकीकडे केंद्रातले मोदी सरकार नशामुक्त भारतासाठी 'झिरो टॉलरन्स' ची नीती अवलंबत आहे तर अशावेळी ५६०० कोटी रुपयांच्या अमली पदार्थ तस्करीत कॉंग्रेसशी संबंधित व्यक्तीचे समोर आलेले नाव ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, असे शहा यांनी सांगितले.

कॉंग्रेस सरकारांच्या काळात पंजाब, हरियानासहित समग्र उत्तर भारतात अमली पदार्थांमुळे युवकांचे जे हाल झाले ते पाहिले आहे. मोदी सरकार युवकांना खेळ, शिक्षण आणि कौशल्याकडे नेऊ पाहत आहे तर दुसरीकडे काँग्रेस युवकांना अमली पदार्थाच्या अंधाऱ्या दुनियेत नेऊ पाहत आहे.

काँग्रेसचे नेते युवकांना अमली पदार्थांच्या दलदलीत अडकवू पाहत आहे, मात्र त्यांचे इरादे सफल होऊ दिले जाणार नाहीत. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘रालोआ’ सरकारकडून त्यांचे पद अथवा प्रतिष्ठा न पाहता कारवाई केली जाईल, असेही शहा यांनी नमूद केले. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी कॉंग्रेसशी संबंधित तुषार गोयल नावाच्या आरोपीस अलीकडेच दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

गोयल हा काही वर्षापूर्वीपर्यंत कॉंग्रेसच्या आरटीआय विभागाचा अध्यक्ष होता. तस्करीचा पैसा कॉंग्रेस निवडणुकीत वापरत आहे काय? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला. गोयल याचे कोणासोबत काय संबंध आहेत, हे काँग्रेसने स्पष्ट करावे. तसेच हरियानातील हुडा कुटुंबाने गोयलसोबतच्या संबंधावर खुलासा करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT