Arvind Kejriwal Esakal
देश

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? 'आप' नेत्यांच्या ट्वीटमुळे खळबळ

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे.

दरम्यान, ईडीची टीम गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना अटक करू शकते. असे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया X वर दावा केला आहे की अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडी छापे टाकणार असल्याची बातमी येत आहे. अटक होण्याचीही शक्यता आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्वीट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी देखील एक्स या सोशल मिडीया अकाऊंट वरून पोस्ट केली आहे.

राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी तपास यंत्रणेला लिहिले की ते राज्यसभा निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीमध्ये ते व्यस्त आहेत, परंतु त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास ते तयार आहेत. आप प्रमुखांनी एजन्सीला लिहिलेल्या त्यांच्या आधीच्या पत्रांना उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी कथित चौकशी/तपासासाठी बोलावण्यामागील खरा हेतू आणि या चौकशीचे स्वरूप याबाबत स्पष्टीकरण मागितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

SCROLL FOR NEXT