ED  Sakal
देश

ED Raid: 'चुकून तुमचं नाव आलं', ईडीने एक पाऊल मागे घेत चक्क मागितली माफी, खासदाराचा दावा

चुकून तुमचे नाव चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

राहुल शेळके

ED Raid: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीने आपल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे नाव जोडले होते.

आता ईडीने आपल्याला पत्र लिहून खेद व्यक्त केल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. चुकून तुमचे नाव चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

यापूर्वी, जेव्हा ईडीच्या आरोपपत्रात संजय सिंह यांचे नाव समाविष्ट होते, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत ईडीवर फौजदारी मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले होते.

संसदेत केलेल्या भाषणामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी त्यांनी संसदेत ईडी-सीबीआयवर भाषण केले होते आणि या वर्षी 6 जानेवारी रोजी ईडीच्या आरोपपत्रात त्यांचे नाव आले होते.

संजय सिंह यांनी वित्त सचिवांना लिहिले पत्र:

संजय सिंह यांनी ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि सहाय्यक संचालक जोगिंदर यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारत सरकारच्या वित्त सचिवांना पत्रही लिहिले होते.

त्यांनी पत्र ट्विट केले आणि म्हटले की, "ईडीचे खोटे उघडे पाडू. पुढील कारवाईसाठी माझे पत्र भारत सरकारच्या वित्त सचिवांना आहे."

काय आहे दारू घोटाळा प्रकरण?

दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर दिल्ली सरकारने महसूल वाढीसोबतच गुंडगिरी बंद करण्याचा युक्तिवाद केला होता, मात्र नेमके उलटे झाले.

दिल्ली सरकारचा महसूल बुडाला. जुलै 2022 मध्ये, दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये मनीष सिसोदिया यांच्यावर दारू व्यापाऱ्यांना फायदा करुन दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT